मुंबई : शेती व्यवसयामध्ये यांत्रिकिकरणाचे महत्व वाढत आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होतेच पण शेतकऱ्यांचे कष्टही कमी होत आहेत. यांत्रिकिकरण ही काळाची गरज झाले आहे. त्याचअनुशंगाने भारतामध्ये इलेक्ट्रीक ट्रॅक्टर निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. देशातील पहिली (E-Electric Tractor) इलेक्ट्रिक ट्रॅक्टर निर्माता कंपनी (Cellestial E-Mobility) ‘सेलेस्टियल ई-मोबिलिटीने मेक्सिकन’ कंपनी ग्रुपो मार्वलसासोबत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्सच्या मार्केटिंग आणि वितरणासाठी करार केला आहे. या अंतर्गत सेलेस्टियल ई-मोबिलिटी कंपनी भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्सची मेक्सिकोला (Tractor Export) निर्यात केली जाणार आहे. दोन्ही कंपन्यांमधील करारानुसार येत्या तीन वर्षांत 4 हजार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मेक्सिकन बाजारात विकण्याचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे. ही ‘मेक इन इंडिया व्हिजन’ची मोठी उपलब्धी म्हणजेच भारतातून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्सची निर्यात केली जाणार आहे. त्याचबरोबर या करारामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिकच दृढ होतीलच, शिवाय इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात मेक इन इंडियाच्या उत्पादनाला चांगली चालनाही मिळणार आहे.
गेल्या काही काळापासून भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची खूप जाहिरात केली जात आहे. कार, टू-व्हीलर किंवा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर… देशातील पेट्रोल आणि डिझेलवरच अवलंबून न राहता आणि प्रदूषण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतीमालाचा एकूण खर्च आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेडसावणारी अडचण यावर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा चांगला पर्याय आहे. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देत हैदराबादची ही कंपनी भारतातून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर निर्यात करणार आहे.
‘सेलेस्टियल ई-मोबिलिटी’चे संस्थापक सिद्धार्थ दुरराजन म्हणाले, की, “निर्यात देशाव्यतिरीक्त ग्रुपो मार्वलसा बरोबर प्रचंड धोरणात्मक आणि आंतरराष्ट्रीय विपणन करार मिळाला आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे उत्पादन आणि स्थानिक बाजारात विक्री करण्याबरोबरच, उत्तर-अमेरिकन ई-ट्रॅक्टर बाजारात सेवा देण्यासाठी मेक्सिकोच्या उत्पादन शक्तीचा फायदा होईल. त्यांच्या मते, भारतात तयार झालेल्या इलेक्ट्रीक ट्रॅक्टरचे हे पहिले उदाहरण असेल, जे दुसऱ्या देशात निर्यात केले जाईल. ‘ई-मोबिलिटी’ने तयार केलेल्या या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्सचा वापर खासकरून कृषी, विमानतळ जीएसई आणि मालवाहतूक करणाऱ्या कॅरिअर्स क्षेत्रात केला जात आहे.
हैदराबाद येथील सेलेस्टियल ई-मोबिलिटी आता मेक्सिकन कंपनीच्या भागीदारीत येत्या तीन वर्षांत 4 हजार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. म्हणजेच या कंपनीच्या भविष्यातील योजना आहेत. मेक्सिकोमध्ये, त्याच्याकडे अगोदरच 2 हजार 500 डिलरशीप, 800 अधिकृत सेवा केंद्रे आणि 35 वाहन युनिट्सचे विशाल जाळे आहे आणि लवकरच हे लक्ष्य साध्य करण्यास सक्षम होईल अशी असल्याचे सांगण्यात आले आहे.
औषधी चिया बियाणे : कमी वेळेत अधिकचा नफा, कळंबच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
दुष्काळात तेरावा : कोरोनामुळे शेतीचा जोडव्यवसयाच धोक्यात, परिस्थितीने धवल क्रांतीवर ‘विरझण’