PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!

| Updated on: Mar 26, 2022 | 9:38 AM

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत सातत्याने बदल होत आहेत. योजनेत अनियमितता आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत मिळावी यासाठी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. 1 जानेवारी रोजी या योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यानंतरच्या म्हणजेच 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता 31 मार्च ही अखेरची मुदत होती. मात्र, स्थानिक पातळीवरच्या अडचणी आणि शेतकऱ्यांना पुरेसा वेळा मिळावा या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे.

PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेत सातत्याने बदल होत आहेत. योजनेत अनियमितता आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत (Central Government) सरकारची मदत मिळावी यासाठी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. 1 जानेवारी रोजी या योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यानंतरच्या म्हणजेच 11 व्या हप्त्यासाठी (Farmer) शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता 31 मार्च ही अखेरची मुदत होती. मात्र, स्थानिक पातळीवरच्या अडचणी आणि शेतकऱ्यांना पुरेसा वेळा मिळावा या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना e-KYC हे अनिवार्य राहणार आहे पण यासाठी आता 31 मे पर्यंतची मुदत असणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ तर मिळणार आहे पण योजनेत नियमितता आणण्यासाठी प्रशासनाकडूनही योग्य ती यंत्रणा राबवली जाणार आहे.

गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा

पीएम किसान योजनेचा आता 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. वर्षाकाठी 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. योजनेचे हे 6 वे वर्ष आहे. मात्र, दरम्यानच्या काळात अपात्र नागरिकांनीही याचा लाभ घेतला आहे. शासकीय कर्मचारी, आयकर अदा करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही असे असताना लाखो नागरिकांना लाभ घेतला आहे. आता अशा नागरिकांकडून वसुली केली जात आहे. याची जबाबदारी ही महसूल आणि कृषी विभागावर असली तरी प्रत्यक्षात अजूनही या कामाला सुरवात झाली नाही.

शेतकऱ्यांकडे आता 2 महिन्याचा कालावधी

जानेवारीमध्ये 10 हप्ता जमा झाल्यानंतरच e-KYC हे बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. एवढेच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी e-KYC केले नाही अशा शेतकऱ्यांची नावे ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यानुसार आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल नं.याची पूर्तता करुन शेतकऱ्यांना e-KYC करता येणार आहे.

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया..

1. ई-केवायसी साठी प्रथम योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.तिथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
2.तिथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
3.यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी बटणवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर OTP पुन्हा येईल जो 6 अंकांचा असेल. ते भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

संबंधित बातम्या :

Cotton Rate | अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी भाव, कापसाला मिळाला 12 हजार रुपये Rate

बैलगाडा शर्यतीच्या परवानगीमुळे संस्कृतीचे जतन अन् ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीही

Lemon Production: मागणी वाढली अन् उत्पादन घटलं, नैसर्गिक संकटाने सर्वकाही हिरावलं