अमरावती : काळाच्या ओघात (Birthday) वाढदिवस साजरा करण्याच्या पध्दती ह्या बदलत आहे. आज-काल तर गावखेड्यातील गल्ली बोळात ते मेट्रो शहरांमध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या एक ना अनेक प्रकार समोर येत आहेत. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवासाचे निमित्त साधून विविध (Social activities) समाज उपयोगी उपक्रमही राबवले जातात. हे झाले व्यक्तींबद्दल पण अमरावतीमध्ये सध्या चर्चा आहे ती सर्जाच्या वाढदिवसाची. शेतकरी जरी जगाचा पोशिंदा असला तरी त्याचा पोशिंदा असलेल्या सर्जाचा वाढदिवस आणि तो ही अल्पभूधारक (Farmer)शेतकऱ्याने साजरा केला आहे. अहो खरचं अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील घोडचदि शहीद येथील दिलीप दामोदर वडाळा हे गेल्या आठ वर्षापासून सर्जाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहेत. यावेळी तर त्यांनी सर्जाचा वाढदिवस साजरा करुन एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
घोडचदि शहीद लगतचे पिंपळोद परिसरातील परमपूज्य परशराम महाराज यांचे झीरा पवित्र मानले जाते. आपल्या सर्जाचा वाढदिवसही याच पवित्र ठिकाणी व्हावा ही मनीषा दिलीप वडाळ यांची इच्छा होती. त्यानुसार मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते तर वाढदिवसाचे निमित्त साधून वडाळ परिवाराने यावेळी अन्नदानाचा उपक्रम केला. वाढदिवस सर्जा या बैलाचा असला तरी शेतकरी दिलीप वडाळ यांचा उत्साह काही औरच होता. पंचक्रोशीतील ग्रामस्थ त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करीत होते.
केवळ शेती असून उपयोग नाही तर ती योग्य पध्दतीने केली तरच उत्पादन पदरी पडते. मशागतीपासून ते पेरणीपर्यंतची कामे ही बैलांवरच अवलंबून आहेत अल्पभूधारक असतानाही केवळ बैलांमुळे उत्पादनात वाढ झाली आणि आर्थिक परस्थिती सुधारली असल्याचे दिलीप वडाळ यांनी सांगितले आहे. सर्वकाही बैल जोडीमुळेच शक्य झाले असून वाढदिवस साजरा करुन त्याच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येते म्हणून हा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दिलीप दामोदर वडाळा हे गेल्या आठ वर्षापासून बैलजोडीचा सांभाळ करीत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच शेती व्यवसयात बदल झाला असून या बैलजोडीचा सांभाळ ते पोटच्या मुलाप्रमाणे करीत आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला पत्नी मनीषा यांचेही सहकार्य असल्याने असा वेगळा उपक्रम गावात पार पडला आहे. त्यामुळे भविष्यात ही परंपरा रूढ होईल असा त्यांना विश्वास आहे.
Organic Farm : हिमाचल प्रदेशचा नैसर्गिक शेतीचा आराखडा तयार, जिथे सुरवात झाला त्या महाराष्ट्रात काय?
पिकांमधील कीड व्यवस्थापनात पिवळ्या अन् निळ्या चिकट सापळ्यांची काय भूमिका?