Agricultural News : शेतकऱ्याने दूध-शेण विकून करोडोंचा आलिशान बंगला बांधला, महिन्याला लाखोंची कमाई

| Updated on: Jun 26, 2023 | 1:06 PM

farmer success story : सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा यशस्वी प्रवास अनेकांना भारावून टाकत आहे. सुरुवातीला एक गाई घेतली, आज १५० गायी आहेत. दूधाचं इतकं उत्पादन होतं की, महिन्याला लाखोंची कमाई आहे.

Agricultural News : शेतकऱ्याने दूध-शेण विकून करोडोंचा आलिशान बंगला बांधला, महिन्याला लाखोंची कमाई
SOLAPUR FARMER NEWS
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात (maharashtra solapur) राहणाऱ्या एका शेतकऱ्याने गाईचं दूध आणि शेणं विकून करोडो रुपयांचा अलीशान बंगला बांधला आहे. त्या शेतकऱ्यांचं नाव प्रकाश इमडे (Prakash imade) असं आहे. त्यांनी १९८८ साली दुधाचा व्यवसाय सुरु केला होता. एका गाईपासून त्यांनी डेअरी सुरु केली होती. आज त्यांच्याकडं १५० गायी आहेत. ते गाईचं दूध आणि शेण विकून (Agricultural News) महिन्याला लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. शेतकऱ्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्याचबरोबर त्यांना इतर राज्यातील शेतकरी सुध्दा भेटायला येत आहेत.

दूध आणि शेणं विकतात

शेतकरी प्रकाश इमडे यांच्याकडे चार एकर जमीन आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ स्थिती होती, त्यावेळी त्यांना शेती करणं परवडतं नव्हतं. त्यांनी स्वत:ची एक डेअरी सुरु केली. त्यावेळी सुरुवातीला त्यांच्याकडे एकचं गाय होती. त्या गाईचं दूध ते गावात जाऊन विकत होते. आज त्यांच्याकडे दीडशे गाई आहेत. ते रोज १ हजार लिटर दूध विकतात. त्याचबरोबर त्या गाईचं दूध विकून ते महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतात. या कामात त्यांची पुर्ण फॅमिली त्यांना मदत करते.

गावातल्या लोकांना रोजगार

प्रकाश इमाडे सांगतात, हा व्यवसाय करीत असल्यामुळे गावातील लोकांना नेहमी रोजगार उपलब्ध होत आहे. त्यांची फॉर्म पाहायला इतर राज्यातून शेतकरी येत आहेत. त्याचबरोबर ते येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यांनी गायीचं पालन करुन करोडो रुपयांचा अलिशान बंगला बांधला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या बंगल्यात गाईचा पुतळा सुध्दा लावला आहे.

हे सुद्धा वाचा

गायींची विशेष काळजी घेतली जाते

प्रकाश इमडे यांच्याकडे १९९८ मध्ये एकचं गाय होती. त्यांनी त्यावेळी हळूहळू गायी वाढवण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे दीडशे गाई आहेत. त्यांनी आतापर्यंत एकही गाय विकलेली नाही. ते गाईचा चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य या गोष्टीकडं अधिक लक्ष देतात. प्रकाश इमडे यांनी नव्या टेक्निकचा वापर केला आहे. त्याच्याकडे काही अशा गाई आहेत, ज्या पंजाबच्या गाई एवढ्या दूध देत आहेत. सगळ्या गाईंना दररोज चार ते पाच टन हिरवा चारा लागतो.