पुणे : यंदाच्या उन्हाळी हंगामात (A nurturing environment) पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी मुख्य (Crop Change) पिकांमध्ये बदल करुन उत्पन्न वाढविण्याचा तर प्रयत्न केला मात्र, दुसरीकडे चारा पिकांतून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मिटवलेला आहे. सर्वच प्रकारच्या चाऱ्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते. त्यामुळे आता मे आणि जून महिन्यापर्यंत (Shortage of fodder) चारा टंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे. मात्र, पीके अंतिम असताना पाण्याची कमतरता आणि वाढत्या उन्हामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. ज्वारी, गहू या पिकांना बाजूला सारुन शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन आणि हरभऱ्यावर भर दिला होता तर दुसरीकडे ज्वारीच्या क्षेत्रात घट झाल्याने कडबा या चारा उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात राज्यात मका, कडवळ, बाजरी, नेपिअरग्रास आदी चारा पिकांची लागवड केली आहे.
उन्हाच्या झळा आणि चारा उपलब्ध नसल्याचा परिणाम थेट जनावरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळी पिकांबरोबर चारा पिकांचीही व्यवस्था या दरम्यानच्या काळात केली जाते. त्यामुळेच पुणे विभागात मका, कडवळ, बाजरी, गवत यासारख्या चारा पिकाते उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच मे आणि जून महिन्यात चारा टंचाई भासत नाही. ऐन गरजेच्या दरम्यान चारा उपलब्ध रहावा या दृष्टीकोनातून उन्हाळी हंगामात नियोजन केले जाते. शिवाय टप्प्याटप्प्याने चारा उपलब्ध व्हावा यावर शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे.
चाराटंचाईचा सर्वाधिक परिणाम हा दूध उत्पादनावर झालेला आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढूनही त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत नाही. हिरावा चारा तर नाहीच पण कडबाही 1 हजार रुपये शेकडा मिळत आहे. दुभत्या जनावराला अधिकच्या उसाचा धोका निर्माण होत असल्याने शेतकरी इतर मार्ग निवडतात. तर दुसरीकडे कळणा, सरकी, पेंड याचेही दर वाढलेले आहेत. एकंदरीत चारा टंचाईमुळे दूध उत्पादनावर तर परिणाम झालेला आहेच पण शेती उत्पादनातून मिळालेल्या पैशात चारा खरेदी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावत आहे.
यंदा पोषक वातावरण पाण्याची उपलब्धता यामुळे चारापिकाचेही क्षेत्र वाढले आहे. पुणे विभागात 17 हजार 170 हेक्टरावर पेरा झाला होता. यामुळे मे, जून महिन्यात चारा टंचाई भासणार नाही. पुणे विभागात सर्वाधिक चारापिके ही सोलापूर जिल्ह्यात घेतली गेली आहेत. या जिल्ह्यामध्ये 9 हजार 277 हेक्टरावर पेरणी झाली आहे. शिवाय एकाच पिकावर भर न देता यामध्ये वेगळेपण साधून दूध उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.