पुणे : शेती मुख्य व्यवसयापेक्षा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधार आहे तो (Milk Business) दुग्ध व्यवसयाचा. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे घटलेली मागणी यामुळे (Milk Price) दूधाच्या दरात वाढ झालेली नव्हती. तर दुसरीकडे पशूखाद्याचे दर हे महिन्याकाठी वाढत आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी हा जोड व्यवसाय टिकून ठेवलेला आहे. त्याचे फळ आता उन्हाळा सुरु झाला की मिळाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बाजारात लोणी व दूध बुकटीच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी दोन वर्षानंतर का होईना (Cow’s milk) गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गायीच्या दूधाला 30 रुपये दर मिळत असून अणखीन यामध्ये दोन रुपयांची वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे दूधाच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम आहेत. पशूखाद्याचे दर हे दर महिन्याला वाढत आहेत तर दूधाचे दर हे दोन वर्षातून. त्यामुळे ही दरी कशी भरुन काढावी हा प्रश्न कायम आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मिल्क पावडर व बटर यामध्ये तेजी आली आहे. पावडरचे दर हे 180 रुपयांवरुन आता 270 रुपये किलोंपर्यंत पोहचलेले आहेत तर दुसरीकडे लोण्यापासून तयार होणारे बटर हे 240 वरुन 350 रुपेय किलो असे विकले जात आहे. त्यामुले खासगी डेअरीमधील पावडर व लोण्याचे साठे कमी होत आहेत. परिणामी गायीच्या दरात वाढ झाली आहे.
केवळ राज्यातच नाही तर जागतिक बाजारपेठेतही दुग्धजन्य पदार्थाच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे दूध पावडरचे दर हे प्रति किलो 90 रुपयांनी वाढलेले आहेत तर बटरचे दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गायीचे दूध हे 28 रुपयांवरुन आता 30 रुपये लिटरवर गेले आहे. दुग्धजन्य पदार्थांना अशीच मागणी राहिली तर गायीच्या दूध दरात अणखीन वाढ होणार असल्याचे सोनाई दूध डेअरीचे गणेश शेटे यांनी सांगितले आहे.
दूधाच्या दरात वाढ झाली तर ती 1 किंवा 2 रुपयांनी वाढ होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांमध्ये खाद्यच्या दरात दुपटीने वाढ झालेली आहे. कळण्याचे 50 किलोचे पोते हे 600 वरुन 1000 वर गेले आहेत. मक्यापासून बनवलेली कांडी ही 1000 हून 1400 तर सरकी 600 वरुन 1000 वर तर खापरी पेंडीचे दर हे चार महिन्याखाली 2000 वर होते तेच दर आता 2700 वर गेले आहेत. त्यामुळे मेहनत आणि खर्चाचा विचार करता शेतीचा मुख्य जोडव्यवसाय हा अडचणीत आलेला आहे.
सरकार शेतकऱ्यांचे की कारखानदारांचे…! ‘त्या’ निर्णयाची नांदेडमध्ये होळी
Good News : केळीचा गोडवा वाढला, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला