जळगाव : शेतकऱ्यांना केवळ हंगामी पिकांचा विमा परतावा मिळण्यातच अडचणी नाहीत तर (Fruit Crop Insurance) फळबाग धारकांचीही अवस्था तशीच आहे. जिल्ह्यात फळबाग विमा योजनेतील सहभागापासून परतावा मिळण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता (Raksha Khadse) खा. रक्षा खडसे यांनी पीक विमा कंपनीचे प्रतिनीधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गा लावण्यासंदर्भात आढावा बैठकीत सुचना केल्या आहेत. राज्यात पीक विमा कंपन्यांचा मनमानी कारभार सुरु असून खरीप हंगामातील विमा रकमेपासून तब्बल 84 हजार शेतकरी हे अद्यापही वंचित आहेत. अशातच यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत असतानाच जिल्ह्यातील यावल या तालुक्यालाच फळ पीक विमा योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचे निर्देश खा. खडसे यांनी दिले आहेत.
यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. खरीप हंगामापासून सुरु झालेली नुकसानीची मालिका पुढे फळबागा आणि आता रब्बी हंगामातही सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये तर वाढ झालीच नाही पण नुकसानभरपाईसाठी विमा कपंन्यांच्या परताव्याचा आधार घ्यावा लागत आहे. बदलत्या वातावरणामुळे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई मिळते मात्र, त्यासाठी विमा हप्ता अदा करुन सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. या माध्यमातून अधिकचे उत्पन्न नाही किमान पीकावर झालेला खर्च तरी पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
सन 2021-22 च्या हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभागच विमा कंपनीने करुन घेतलेला नाही. त्यामुळे हजारो शेतकरी हे विमा योजनेपासून वंचित राहणार आहेत. हवामान अधारित विमा योजनेत सहभाग घेता येत असताना डावलण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी खा. रक्षा खडसे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांचा योजनेत सहभाग करुन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनी आता काय भूमिका घेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Animal Bloating : कशामुळे फुगते जनावरांचे पोट? काय आहे उपाययोजना, वाचा सविस्तर
Corona Effect : कोरोना निर्बंधाचे परिणाम पोल्ट्री व्यवसयावर, मागणीतही घट
आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय आहे रणनीती?