नांदेड : नांदेडमध्ये (nanded) बी-बियाण्याच्या खरेदीसाठी नव्या मोंढ्यातील (mendha) बाजारपेठेत शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. बी-बियाणे विक्रेता संघटनेने पक्क्या पावतीशिवाय शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करू नये असे आवाहन केलंय. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी खेडोपाडी कुणी स्वस्तात बियाणे आणून दिले, तर ते घेऊ नये असेही विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे शासन मान्य बी बियाणे आणि औषधांच्या दुकानावर शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. दरम्यान, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करूच नये असे आवाहन कृषी विभागाने (agricultural department) देखील केल्याचं बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विपीन कासलीवाल यांनी सांगितलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना तात्काळ विनाअट पीक कर्ज द्या, मागील काळातील नुकसानीची राहलेली मदत शेतकऱ्यांना तात्काळ द्या, पीक विम्याचा रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्या. सोबतच शेतकऱ्यांच्या काही रास्त मागण्या येत्या 15 जूनपर्यंत मान्य करा. अन्यथा 16 जूनला मुंबई येथील एआयसी कार्यालयात जाऊन 20 व्या माळ्यावरून हजारो शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करू असा इशारा रविकांत तुपकर, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिला आहे.
वाशिम जिल्ह्यात मार्च ते एप्रिल महिन्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, याशिवाय मोठ्या प्रमाणात घरांची पडझडही झाली. या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय स्तरावर सादर करून मदतीसाठी निधीची मागणी केली. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळाली असली, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे घर पडून उघड्यावर आलेल्या अनेक परिवारांना अद्याप कवडीचीही मदत मिळाली नाही. प्रशासनाने दखल घेऊन भरपाई देण्याची मागणी केली आहे.