शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना मात्र लाल मिरचीचा ठसका, नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर

| Updated on: Dec 17, 2021 | 3:21 PM

मिरचीची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार येथे विक्रमी दर मिळाला आहे. येथीव बाजारपेठे मोठ्या प्रमाणात आवक असतानाही दर हे टिकून आहेत. गेल्या 5 वर्षात यंदा सर्वाधिक दर मिळाला असून भविष्यात मागणी वाढली तर दरामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा ग्राहकांना मात्र लाल मिरचीचा ठसका, नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नंदुरबार : अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे सर्वच पिकांचे नुकसान होत झाले असले तरी (Red Chilly) लाल मिरचीने मात्र, शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. मिरचीची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या (Nandurbar) नंदुरबार येथे विक्रमी दर मिळाला आहे. येथीव बाजारपेठे मोठ्या प्रमाणात आवक असतानाही दर हे टिकून आहेत. गेल्या 5 वर्षात यंदा सर्वाधिक दर मिळाला असून भविष्यात मागणी वाढली तर दरामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मुख्य पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले असले तरी हंगामी मिरचीने उत्पादकांना दिलासा दिलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून आवक सुरु झाली आहे. पुरवठा आणि मागणी ही सरासरीनेच असल्याने सध्या 4 हजार रुपये क्विंटल लाल मिरचीला दर आहे.

मिरचीचे दर अन् आवकही विक्रमीच

मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाला तर दर हे घसरतात हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. पण नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवकही आणि दरही विक्रमीच मिळत आहे. लगतच्या राज्यातील शेतकरी देखील याच बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणत आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. येथील बाजारपेठेमध्ये दर हे गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. शेतकऱ्यांना येथील दराबाबत खात्री असल्यानेच आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे.

वातावरणामुळे घटली होती आवक

मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि बदललेल्या वातावरणाचा परिणाम हा मिरची आवकवर झाला होता. ढगाळ वातावरणात मिरचीची आवक झाली तर साठणूकीची समस्या उद्भवते शिवाय शेतकऱ्यांचा माल सादळला जातो. त्यामुळे मध्यंतरी दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. शिवाय बंदच्या दोन्हीही दिवसी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. बंदचा निर्णय योग्य ठरला अनेक शेतकऱ्यांचे नुकसान टळले. आता आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी गेल्या 5 वर्षात जो दर मिळाला नाही तो यंदा मिळत आहे. त्यामुळे गुजरात आणि मध्यप्रदेश येथील शेतकरी देखील विक्रीसाठी मिरची घेऊन येतन आहेत.

मिरचीच्या वाढत्या दराचे परिणाम चटणीवरही

गेल्या 16 दिवसांमध्ये 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. असे असतानाही दर हे टिकून आहेत. वाढत्या दरामुळे आता चटणीच्याही दरावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. घरगुती चटणी करण्यासाठीच येथील मिरचीचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली असली तरी त्याचा परिणाम अद्यापही बाजारपेठेवर झालेला नाही. भविष्यात आवक घटली तर उलट दरात वाढच होणार आहे. येथील बाजार सिमितीचा परिसरावर जणू काही लाल गालीचाच अंथरला असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी वातावरणामुळे घटलेली आवक पुन्हा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या :

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

तूर आयातीमुळे हमीभावापर्यंतही पोहचले नाहीत दर, काय राहणार खरिपातील शेवटच्या पिकाचे भवितव्य

अवकाळीची अवकृपा : अहवाल मागवला पण पंचनाम्यांशिवाय भरपाई मिळणार तरी कशी? शेतकरी चिंताग्रस्त