भंडारा : राज्यात सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक झळ न बसता खरिपाचा पेरा कसा होईल यावर कृषी विभागाचा भर आहे. त्याअनुशंगानेच शेतकऱ्यांना हंगामात अनुदानावर बियाणे दिले जातात. यंदा (Bhandara) भंडारा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना (Subsidy) अनुदानावर भात बियाणे दिले जाणारआहे. शिवाय जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणीच शेतकऱ्यांना ही बियाणे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे नियम-अटींची कोणतिही औपचारिकता न ठरवता शेतकऱ्यांना केवळ सातबारा उतारा कृषी विभागाकडे जमा करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून खर्चात बचतही होणार आहे.
खरीपातील उत्पादन वाढावे व शेतकऱ्यांना कमी खर्चात हंगाम पार पडावा यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून यंदा भंडारा कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात बियाणे आणि कडधान्याच बियाणे अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 10 वर्षाच्या आतमधील 716 क्विंटल बियाणे महाबीज कंपनीकडून मिळणार आहे. कृषी विभागाकडून याला परवानगी देण्यात आली असून वितरणाचेही योग्य ते नियोजन केले जाणार आहे. खरिपातील पेरणी सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना हे बियाणे मिळावे असा प्रयत्न विभागाचा राहणार आहे.
शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंर्तगत कृषी विभागाच्या वतीने अनुदानावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाबिज कंपनी चे बियाणे व कडधान्य बियाणे मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना केवळ सात बारा उतारा कृषी विभागाकडे जमा करावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात येण्याची गरज नाही तर कृषी पर्यवेक्षक,कृषी साहाय्यक यांच्याकडेही जमा करता येणार आहे. बियाणांसंदर्भात शेतकऱ्यांना आगोदर मार्गदर्शनन केले जाणार आहे. त्यामुळे योग्य पेरणी उत्पादनात वाढ असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
अनुदानात बियाणे देण्याचा निर्णय राज्य सरकारचा असला तरी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवरील कृषी सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागणार आहे. त्याअनुशांगाने बियाणे वाटपाचे परवाने कृषी केंद्राला देण्यात आले आहेत. त्यामुळे तेथूनच शेतकरी महाबिज कंपनीचे बियाणे व कडधान्य ची उचल करु शकतो.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अनुदानावर मिळणाऱ्या बियाणे ची उचल करावे असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याच बरोबर बियाणांच्या रुपातून शेतकऱ्यांना मदत मिळावी हा उद्देश आहे.