जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : खतांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक द्रव्यांची फवारणी (Spraying of chemicals) यामुळे शेतीतील उत्पादन खर्च (Cost of production in agriculture) वाढत होता. त्यासोबत रासायनिक खतांनी कीटकनाशके यांच्या वाढत्या प्रमाणामुळे जमिनीची पोतही खालवत होती. या गोष्टी लक्षात घेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळला असून यातून उत्पादन ही अधिक आणि दरही चांगले मिळत असल्याने शेतकरी (farmer) समाधानी आहेत अशी माहिती मिळाली आहे. मागच्या कित्येक वर्षापासून रासायनिक द्रव्यांच्या अती फवारणीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्याबरोबर पूर्वीसारखं उत्पादन घेता येत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.
शहादा तालुका हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे, या भागात शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या सेंद्रिय शेतीला पसंती दिली आहे. 2018 मध्ये चार एकर शेतीपासून या अभियानाला सुरुवात झाली होती. आता हेच क्षेत्र अकराशे एकरपेक्षा अधिक झाले आहे. यामुळे जमिनीची उपजक क्षमता सुधारली असून, जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पिकाच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे असं भूषण छाजेड यांनी सांगितलं.
सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील गुणवत्ता सुधारली असून उत्पादन खर्च खूप कमी झाला आहे. रासायनिक पद्धतीने केळीची शेती केली तर एका झाडाला दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खर्च येत असतो, तर सेंद्रिय शेतीत 36 रुपये खरुज येतो, त्यामुळे पैशांची बचत आणि सेंद्रिय शेतीतील उत्पादित मालाला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे असं अखिलेश राजपूत यांनी सांगितलं
रसायन मुक्त शेती या अभियानाची सुरुवात झाली असून यात अनेक खाजगी कंपन्या ही आता पुढे येत आहेत, यातून उत्पादित होणारा माल खरेदी केला जात असून त्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होता चालली आहे.
वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात सिंचनासाठी कमी क्षमता असलेल्या रोहित्रांवर अनेक ठिकाणी अतिरिक्त भार वाढत आहे. वीज चोरटे तारांवर आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याने भार वाढून रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा त्रास नियमित वीज बील भरणाऱ्या शेतकऱ्यांना होत असून, नादुरूस्त विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.