नवी दिल्ली : बहुतेक शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते, असा काही शेतकऱ्यांचा समज आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यासही चांगले उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी शेणखताचा वापर करावा लागेल. चांगल्या आरोग्यासाठी लोकं सेंद्रीय शेतीकडे वळत आहे. सेंद्रीय पद्धतीने घेतलेल्या फळ, भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत.
असेच एक शेतकरी आहेत शिवकुमार. ते उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी आहेत. शिवकुमार गेल्या काही वर्षांपासून गिनौरा नंगली येथे सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करतात. गाईचे शेण आणि गोमुत्राचा वापर करतात. भाजीपाला विक्रीसोबतच गावातील लोकांना मोफत भाजीपाला देतात.
शिवकुमार यांनी लवकीची शेती केली. ते शेणखत आणि गोमुत्राचा खत म्हणून वापर करतात. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. त्यामुळे त्यांचा भाजीपाला लवकर खराब होत नाही. शिवाय टेस्टही चांगली लागते.
शिवकुमार सांगतात की, गायीचे शेण आणि गोमुत्राचा खत म्हणून वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. सेंद्रीय शेतीची मागणी जास्त आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी होते. कोणतेही रोपं लावण्यापूर्व शेणखत आणि गोमुत्राचा वापर केला जातो. त्यानंतर रोपटे लावतात. बीज अंकुरीत झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी गोमुत्र शिंपडलं जातं. यामुळे रोपावर कीटकाचा परिणाम होत नाही.