Nandurbar : नोंदणी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांची 67 हजार जणांनीच केली ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया, उर्वरित शेतकऱ्यांसमोर पर्याय काय?

| Updated on: Jun 24, 2022 | 9:33 AM

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता ई-केवायसी करणे बंधनकार राहणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहण्यासाठी ही प्रकिया राबवली जाते. यापूर्वी 31 मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता पुन्हा यामध्ये वाढ करुन 30 जूनपर्यंत वाढ झाली होती. असे असताना तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Nandurbar : नोंदणी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांची 67 हजार जणांनीच केली ई-केवायसीची प्रक्रिया, उर्वरित शेतकऱ्यांसमोर पर्याय काय?
पीएम किसान योजना
Follow us on

नंदुरबार : शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट व्हावे या अनुशंगाने राज्यासह (Central Government) केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी हे या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, योजनेत तत्परता यावी या उद्देशाने आता (e-KYC) ई-केवायसी हे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. असे असताना याबाबत (Farmer) शेतकरी किती उदासिन आहेत हे नंदुरबारच्या आकडेवारीवरुन समोर येतंय. पीएम किसान योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 24 हजार लाभार्थीची नोंदणी करण्यात आली आहे. तर यापैकी केवळ 67 हजार शेतकऱ्यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. योजनेचा 12 वा हप्त्याचा लाभ घ्यावयचा असल्यास शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

पुन्हा मुदतीमध्ये वाढ

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता ई-केवायसी करणे बंधनकार राहणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहण्यासाठी ही प्रकिया राबवली जाते. यापूर्वी 31 मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता पुन्हा यामध्ये वाढ करुन 30 जूनपर्यंत वाढ झाली होती. असे असताना तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता 31 जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. यानंतरच आता 12 वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करुन ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

कशामुळे गरज भासली ‘ई-केवायसी’ ची

काळाच्या ओघात योजनेत अनियमितता होत असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. पात्र नसतानाही राज्यातील लाखोंहून अधिक शेतकरी हे योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांची पडताळणी होणे गरजेचे आहे. ई-केवायसी च्या माध्यमातून हे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. आता तो अनिवार्य करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आधारकार्ड वापरून करा e-KYC प्रक्रिया

आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. यावरील ‘Former Coerner’ वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.