Agriculture News : कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे चार लाख रुपयांचे नुकसान

| Updated on: Mar 12, 2023 | 11:49 AM

कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे चार लाख रुपयांचे नुकसान, भरपाई न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची शेतकऱ्याची भूमिका

Agriculture News : कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे चार लाख रुपयांचे नुकसान
BULDHANA FARMER
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project) अंतर्गत अर्थातच पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड (Orchard planting) करण्यासाठी शासनाकडून अनुदान (Grant from Govt) दिले जाते. मात्र लालफीत शाईत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या फाइल्स टेबलाखालून काही मिळाल्याशिवाय समोर ढकलल्या जात नाहीत. परिणामी याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातल्या बायगाव येथील शेतकऱ्यासोबत घडला आहे. शेतकऱ्याचे तब्बल चार लाख रुपये आता अडकून पडले आहेत. एक प्रकारे नुकसानच झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

बायगाव येथील कृषी सहाय्यक शिवाजी शिंगणे यांनी पोखरा योजनेअंतर्गत लागवड करण्यात येणाऱ्या फळबागेची पूर्वसंमती वेळेत न दिल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मोठ नुकसान झाले आहे. शेतकरी प्रसाद नागरे यांनी याबाबत कृषी अधीक्षकांकडे तक्रार देखील केली आहे.

यासंदर्भात आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक यांना विचारले असता त्यांनी देखील या कृषी सहाय्यक बद्दल अनेक तक्रारी आल्याचं मान्य केलं, शिवाय चौकशी करून या संदर्भात कारवाई करण्याचे देखील आश्वासन संतोष डाबरे , जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढतं, मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होतच नाही. हे यावरून तरी दिसतंय.

मागच्या आठदिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या बागांचं नुकसान झालं आहे.