किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलंय, 31 मार्चपूर्वी परतफेड करा अन्यथा बसेल मोठा फटका

| Updated on: Mar 20, 2021 | 12:54 PM

किसान क्रेडिट कार्डवर घेतलेली रक्कम जमा करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. kisan credit card loan kcc

किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलंय, 31 मार्चपूर्वी परतफेड करा अन्यथा बसेल मोठा फटका
किसान क्रेडिट कार्ड
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 1 एप्रिल ते 15 एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सात हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाचे पैसे शेतकऱ्यांना परत करावे लागणार आहेत. किसान क्रेडिट कार्डवर घेतलेली रक्कम जमा करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. (Farmers must refund kisan credit card loan before 31 march PM kisan next instalment credited soon)

व्याजदर 4 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांवर जाणार

शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज 31 मार्चपूर्वी परत केलं नाही तर त्यावरील व्याजदर 3 टक्क्यांनी वाढणार आहे. 4 टक्के असलेला व्याजदर 7 टक्क्यांवर जाईल. किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असा असतो. गेल्यावर्षी सरकारनं लॉकडाऊन असल्यानं दोनवेळा मुदतवाढ दिली होती.मात्र, यावेळी मुदतवाढ मिळण्याची चिन्ह कमी आहेत.

किसान क्रेडिट कार्डनं सहजरित्या कर्ज

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

पीएम किसान योजनेचा लाभ 11.71 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. केंद्र सरकारचा 14.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 11.71 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झालीय.

संबंधित बातम्या:

किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर किती व्याज लागतं, शेतकरी त्यांचा पैसा कसा वाचवू शकतात?, जाणून घ्या

आता क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, फक्त करा ‘हे’ काम

(Farmers must refund kisan credit card loan before 31 march PM kisan next instalment credited soon)