लातूर : यंदाच्या हंगामात ((Soybean Rate) सोयाबीनच्या दराला घेऊन रंजक घटना घडलेल्या आहेत. हंगामाच्या सुरवातील मुहूर्ताच्या सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. सर्वप्रथम हिंगोली बाजार समितीमध्ये 11 हजार 500 चा दर काढण्यात आला होता. त्यामुळे यंदा सोयाबीन दराचे सर्व विक्रम मोडणार की काय असेच चित्र तयार करण्यात आले होते. मात्र, मुहूर्ताच्या दरानंतर सुरु झालेली पडझड ही दिवाळीपर्यंत कायम होती. दिवाळीनंतर तर दरात अणखीन घट होणार असे चित्र व्यापाऱ्यांनी निर्माण केले होते. मात्र, योग्य दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्रीच करायची नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. ( Farmers’ Solidarity) तीच एकजूट आज कामी आली आहे. मागणी असूनही आवक वाढत नसल्याने 4 हजार 500 रुपयांवर असलेले सोयाबीन आज 6 हजारावर येऊन ठेपले आहे. शिवाय हे दर केवळ दहा दिवसांमध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे मनात आणले तर शेतकरी काय करुन दाखवतो हेच यावरुन स्पष्ट झाले आहे.
मागणीपेक्षा आवक कमी होत असल्याने प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांनीही सोयाबीन खरेदीला सुरवात केली आहे. त्यामुळे दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आता कुठे दर वाढत आहेत. सोयाबीनचे दर कमी कालावधीत अधिक वाढल्याने पोल्ट्री ब्रीडर्सलाही याची दखल घ्यावी लागली आहे. सोयाबीनचे दर नियंत्रणात आणावेत यासाठी त्यांनी थेट पशूसंवर्धन मंत्री यांनाच निवेदन दिले होते.
दिवाळीनंतर बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होणार आणि दर अणखीन कमी होणार असा अंदाज व्यापाऱ्यांनीही बांधला होता. पण शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवरच भर दिला. शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतूनच व्यापाऱ्यांनाही उत्तर दिले आहे. हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटले असतानाही आवक वाढत नसल्याने प्रक्रिया उद्योजकांनी खरेदी वाढवली आणि दर वाढीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे.
गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज केंद्र सरकारनेही जाहीर केला होता. मात्र, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथेही पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन हे घटले होते. गतवर्षी सोयाबीनला 10 हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. यंदा तर उत्पादन घटल्याने दरात वाढ व्हायला पाहिजे असा अंदाज शेतकऱ्यांनीच बांधला व सोयाबीनच्या साठवणूकीवर भर दिला. आता सोयाबीनची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसाकाठी दरात वाढ होत आहे. शिवाय अशीच आवक कमी राहिली तरी दराच वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी सोयाबीनच्या दरात वाढ झाली आवकही वाढत होती. मात्र, येथेच शेतकऱ्यांची चूक होत होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सावध पवित्रा सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना देखील आवक ही मर्यादेतच होत आहे. लातूरसारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी या काळात दिवासाला 50 ते 60 हजार क्विंटलची आवक असते. यंदा मात्र, 20 हजारापेक्षा जास्त आवकच झालेली नाही. दर वाढतेल यासाठी केवळ अधिकची आवक होऊ द्यायची नाही हे सुत्रच शेतकऱ्यांनी यंदा कटाक्षाने पाळलेले आहे. त्यामुळेच दिवसाकाठी दरात वाढ होत आहे.
सोयाबीनचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच केंद्र सरकारने 12 लाख टन सोयापेंडची आयात केली होती. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली होती. आयात केलेल्या आणि स्थानिक सोयापेंडच्या दरात फार तफावत नसल्याने आता प्रक्रिया उद्योजक हे स्थानिक सोयापेंडाच अधिकचे महत्व देत आहेत. त्यामुळे 6 हजार रुपयांनी सोयाबीन खरेदी करुनही प्रक्रिया शक्य होत असल्याचे लातूरच्या अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे.
लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ‘तारणारी’ योजना, शेतीमाल साठवणुकीचीही सोय
PM Kisan : सरकारने नियम बदलले! आता ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत
पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडात, फळ बागायत शेतकऱ्यांवर अवकाळीची ‘अवकृपा’