Success story : शेतीसाठी नोकरी सोडली, मुलीने कमावून दाखवले वर्षाचे एक कोटी

| Updated on: May 05, 2023 | 9:47 AM

रोजा आता त्यात शेतीतून वार्षिक एक कोटी रुपये मिळवते. आता ती नोकरी सोडून पूर्णपणे शेती पाहत आहे. आता सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.

Success story : शेतीसाठी नोकरी सोडली, मुलीने कमावून दाखवले वर्षाचे एक कोटी
Follow us on

नवी दिल्ली : उच्च शिक्षण घेऊन मोठ्या कंपनीत नोकरी मिळवणं हे बहुतेकांचं स्वप्न असतं. गावखेड्यात हाच विचार केला जातो. परंतु, रोजा रेड्डी यांच्याबाबतीत ही गोष्ट खोटी ठरली. रोजा यांनी टेक्नॉलॉजीतील नोकरी सोडून शेतीला जवळ केले. शेतकरी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. शेतीसाठी रोजा यांचे कुटुंबीयांशी वादही झाले. रोजा यांच्या वडील आणि भावाने शेती सोडून दुसरा व्यवसाय करण्याचा विचार केला होता. रोजा आता त्यात शेतीतून वार्षिक एक कोटी रुपये मिळवते. आता ती नोकरी सोडून पूर्णपणे शेती पाहत आहे. आता सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे. रोजा यांनी हे सिद्ध करून दाखवलं की, शेती सर्वात मोठा व्यवसाय आहे. योग्य पद्धतीने शेती केल्यास भरपूर पैसे कमवता येतात.

रोजा यांचा जन्म कर्नाटकातील डोन्नेहल्ली गावात झाला. कुटुंबातील लोकं शेती करत होते. रोजाने शिकून शहरात नोकरी करावी, अशी घरच्यांची इच्छा होती. कोरोनात रोजाला वर्क फ्राम होम मिळाले. रोजाने या संधीचा फायदा घेतला.

हे सुद्धा वाचा

नोकरीच्या वेळेनंतर शेतात काम

शेतीतून नुकसान होत असल्याने रोजाचे भाऊ आणि वडील शेती सोडण्याच्या तयारीत होते. अशावेळी रोजाने शेतीत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रोजा यांनी सेंद्रीय पद्धतीचा उपयोग केला. नोकरीतील काम झाल्यानंतर रोजा शेतात चार तास काम करू लागली.

रोजा यांनी नुकसानीचे कारण शोधले होते. याचे कारण रासायनिक खत-औषधांचा अतिरेकी वापर होता. रोजाने ठरवले की ती सेंद्रीय पद्धतीने शेती करेल. रोजाने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन सेंद्रीय शेती सुरू केली. कुटुंबीय म्हणत होते की, रोजाने तिची नोकरी सोडू नये.

कुटुंबीयांना नव्हता विश्वास

कुटुंबीयांना विश्वास नव्हता की, सेंद्रीय शेतीतून उत्पादन वाढवता येऊ शकते. नातेवाईक, कुटुंबीय रोजाला हसत होते. याचा विचार न करता रोजाने नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीसाठी दिला.

रोजा शेतात ४० प्रकारचा भाजीपाला उगवते. यात वांगे, टमाटर, बटाटे, शिमला मिरची, भेंडी, फल्ली आदींचा समावेश आहे. तालुक्याच्या ठिकाणी सेंद्रीय शेती करणाऱ्यांचा समूह तयार केला. याचा उद्देश सेंद्रीय शेतीबद्दल जागरुकता पसरवणे होता.

५०० ते ७०० किलो भाजीपाल्याचे उत्पादन

त्यानंतर रोजाने आपलं नेटवर्क वाढवलं. इतर जिल्ह्यातही याचा विस्तार केला. त्यानंतर रोजा यांनी निसर्ग फार्म्स नावाचं व्हेंटर सुरू केलं. राज्यातील ५०० शेतकऱ्यांचं नेटवर्क तयार झालं. रोजा रोज ५०० ते ७०० किलो भाजीपाल्याचे उत्पादन शेतीतून काढते. रोजा यांचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या व्यवसायात तिने २५ जणांना रोजगारही दिला.