दिल्ली : यंदा वाढत्या उत्पादनाबरोबर (Sugar Export) साखर निर्यातीचे प्रमाणही वाढले होते. साखर निर्यातीमुळे (Sugar Factory) साखर कारखाने फायद्यात असले तरी बाजारपेठेतील दरात मात्र वाढ झाली होती. त्यामुळे केंद्राने साखर निर्यातील अंकूश आणले होते. साखर कारखान्यांचे करार हे अडकून पडले होते तर आता दर नियंत्रणात असून निर्यात बंदी ही कायम होती. त्यामुळे ही बंदी उठवून साखर निर्यातीचा कोटा वाढवून देण्याची मागणी (Dhananjay Mahadik) खा. धनंजय महाडिक यांनी उद्योगमंत्री पियूष यांच्याकडे केली होती. अखेर याला केंद्राने हिरवा कंदील दाखविला असून आता साखर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. 8 लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेले करार आता पूर्ण होणार आहेत तर निर्यातीमधून कारखान्यांना चार पैसे अधिकचे मिळणार आहेत.
यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असल्याने साखर निर्यातीबाबत कारखान्यांनी करारही केले होते. त्यामुळे वाढत्या उत्पादनाबरोबर उत्पन्नही वाढेल असा विश्वास साखर कारखान्यांना होता. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे वाढते दर आणि घटता साठा पाहता निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे एकतर साखर कारखान्यांना देशातच व्यवहार करण्याची परवानगी होती. मात्र, आता दर स्थिर असून वाढत्या उत्पादनामुळे प्रश्नही मिटणार आहे. केंद्राने 8 लाख मेट्रीक टनापर्यंत साखर निर्यातीला परवानगी दिली आहे.
I requested the Union Minister of Commerce and Industry Hon. @PiyushGoyal ji, to issue of ERO for the export of 1 million tonnes of sugar in the country and to give priority to raw sugar and port sugar. pic.twitter.com/w0KdMsa9Tz
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) July 7, 2022
नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी साखर निर्यातीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. राज्यात यंदा विक्रमी साखरेचे उत्पादन झाले होते शिवाय कारखान्यांकडे शिल्लक साठा आहे. त्यामुळे करार करुनही नुकसान टाळायचे असेल तर निर्यातीला मुदतवाढ ही गरजेची होती. सध्या गाळपाचा हंगाम संपला असून उत्पादनात महाराष्ट्राने यंदा उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. त्यामुळे ही मुदतवाढ झाली तर कारखान्यांना फायदा होणार आहे. निर्यातीला मुदतवाढ देण्याची मागणी महाडिक यांनी गोयल यांच्याकडे केली होती.
वाढत्या उत्पादनामुळे यंदा साखर कारखान्यांकडून रॉ अशा साखरेचेही करार झाले होते. मात्र, निर्यातबंदीमुळे ही साखरही थप्पीलाच होती. शिवाय असेच सुरु राहिले तर कारखानदारांचे नुकसान होणार आहे ही बाब महाडिक यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळेच निर्यातीला परवानगी मिळाली असून साखर कारखानदारांचा जीव भांड्यात पडला आहे.