जळगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली तरी पुन्हा बाजारपेठेत वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना थोड्याबहुत प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे. मात्र, (Banana production) केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम राहिल्या होत्या. (Untimely Rain) अवकाळी अन् सततच्या पावसामुळे केळी बागांवर किडींचा प्रादुर्भाव तर होताच पण पुन्हा थंडीत वाढ झाल्याने पंधरा दिवसापूर्वी 4 ते 5 हजार रुपये क्विंटल असे दर होते. मात्र, आता चित्र बदलले आहे. कारण थंडी गायब झाली असून उन्हामध्ये वाढ झाली आहे तर दुसरीकडे महाशिवरात्रीच्या पारर्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून मागणी वाढत आहे. त्यामुळे (Banana Rate) केळी दराचे चित्रच बदलले आहे. आता राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये 15 ते 16 हजार रुपये टन असा दर आहे. त्यामुळे देर आए दुरुस्त आऐ, अशीच अवस्था झाली आहे.
केळीचे दर वाढण्यासाठी आता कुठे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अन्यथा निसर्गाचा लहरीपणा त्यात पुन्हा वातावरण पोषक नसल्याने दरात वाढ होत नव्हती. पण गेल्या 8 दिवसांपासून केळी दराबाबत सर्वकाही बदलत आहे. महाशिवरात्रीनिमित्त केळीला मोठी मागणी असते. शिवाय केळीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे केळीची वाढीव दरामध्ये खरेदी करुन साठवणूक करण्यावर व्यापारी भर देत आहेत. आतापर्यंत केळी खरेदीकडे व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते पण वातावरणातील बदल आणि भविष्यातील महाशिवरात्री यामुळे दरात दुपटीने वाढ झाली आहे.
मध्यंतरी केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. शिवाय त्यात पुन्हा ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे वाढीव दर तर सोडाच पण तोडणीही परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी केळी तोडणी न करता थेट केळीच्या बागाच काढून टाकणे पसंत केले होते. यानंतर आता अवघ्या 15 दिवसांमध्ये विक्रमी दर मिळू लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी गडबडीत हा निर्णय घेतला आता त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली आहे.
निसर्गाचा लहरीपणा त्यात घसरलेले दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट केळीच्या बागच मोडल्या आहेत. पण आता गेल्या दीड वर्षात जो दर मिळाला नव्हता तो दर केळीला मिळालेला आहे. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्ये ज्यांनी जोपासणा केली अशा मोजक्याच शेतकऱ्यांना या वाढीव दराचा लाभ होत आहे. भविष्यातील मागणी आणि शेतकऱ्यांकडील घटलेले उत्पादन यामुळे व्यापारी केळी खरेदी करुन साठवणूकीवर भर देत आहेत.
काय सांगता? दोन वर्षात 14 हजार कांदाचाळींचे नियोजन, असा घ्या अनुदानाचा लाभ अन् कांद्याचे संरक्षण करा