धुळे : दिवसरात्र काबाडकष्ट करुन लाखो लोकांना पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा येते. तो कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने वेढलेला असतो. असंच एक भयानक संकट शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील एका शेतकऱ्यावर ओढावले आहे. या शेतकऱ्याचे नाव प्रमोद निकम असून त्यांच्या शेतात अचानक आग लागल्यामुळे यामध्ये दोन्ही बैलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. दोन धष्टपुष्ट बैलांचा डोळ्यासमोर जीव जाताना पाहून या शेतकऱ्याला रडू फुटलं. (fire broke out in Dhule Shirpur farm two bull died in the fire)
मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात शेतकरी प्रमोद निकम यांच्या शेतात अचानक आग लागली. आधीच उन्हाळा असल्यामुळे या आगीने काही क्षणांत रौद्र रुप धारण केलं. आग लागल्याचे समजताच निकम यांनी धाव घेत, आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतात हवा असल्यामुळे ही आग गोठ्यापर्यंत पोहोचली.
बघता बघता गोठ्यालासुद्धा आग लागली. गोठ्यात गाय, एक वासरु आणि दोन बैल असल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्याने त्यांची सुटका करण्यासाठी जीवाची बाजी लावली. यामध्ये प्रमोद निकम हे गाय आणि वासराला वाचवण्यास यशस्वी झाले. मात्र, आग प्रचंड प्रमाणात लागलेली असल्यामुळे गोठ्यात बांधलेले बैल वाचवण्यात या शेतकऱ्याला यश आले नाही. दोन्ही बैलांचा गोठ्यातच मृत्यू झाला.
शेतात अचानक आग लागल्यामुळे या शेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डोळ्यासमोर धष्टपुष्ट बैलांचा मृत्यू झाल्यामुळे या शेतकऱ्याला ढसाढसा रडू कोसळले आहे. बैलांच्या जीवावरच शेती करत असल्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. या शेतकऱ्याची ही परिस्थिती पाहून अनेकांनी त्याला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
स्वामित्व योजना गावांना आत्मनिर्भर करण्यासाठी महत्वाचं पाऊल: नरेंद्र सिंह तोमर
FACT CHECK | खरच डीएपीच्या किंमती 300 रुपयांनी वाढवल्या? इफकोनं काय केला दावा?
(fire broke out in Dhule Shirpur farm two bull died in the fire)