मुंबई : लोकं म्हणतात कोणतंही काम छोट-मोठं नसतं, ज्या कामामुळे तुमच्या कुटुंबियांच्या खर्चाचे पैसे मिळतात ते काम सगळ्यात उत्तम असतं. इंटनेटच्या (Internet) दुनियेत काम करण्याच्या पद्धती सुध्दा बदलल्या आहेत. कोरोनाच्या (Corona) काळापासून ऑनलाईन (Online work) काम करण्याची पद्धत अधिक वाढली आहे. त्यामुळे तुम्ही सुध्दा घरी बसून एखादा व्यवसाय सुरु करु शकता.
‘डेली स्टार’मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात अनेकांना यापुढे आपलं आयुष्य कसं जगायचं याचा धडा शिकवला आहे. थायलंडच्या एका शेतकऱ्याने एक भारी आयडीया केली आहे. तो आपल्या शेतात पर्यटकांना ठेवण्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क घेत आहे.
हा शेतकरी तिथं येणाऱ्या पर्यटकांना शुध्द हवा विकत देत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याने पर्यटकांसाठी एक पॅकेज सुद्धा तयार केलं आहे.
त्या शेतकऱ्याचं वय 52 वर्षे आहे. त्याचबरोबर त्या शेतकऱ्याची Hellfire Pass परिसरात चांगली मालमत्ता आहे. विशेष म्हणजे ती मालमत्ता शिमला आणि मनालीपेक्षा अधिक सुंदर आहे. तिथं ते शेती सु्ध्दा करतात. त्यांनी शेती करीत असताना पर्यटकांसाठी विशेष ठिकाणं तयार केली आहेत. आता शेतकऱ्याने एक दावा केला आहे, देशात फक्त माझ्या शेतात शुद्ध हवा आहे. पर्यटकांनी तिथलं पॅकेज घेतलं तर त्यांना जेवण सुध्दा मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी जाहीर केलं आहे.
एशियन लाइफ सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे सचिव दुसित यांची ही कल्पना खूप लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे दुसित हे तिथं येणाऱ्या मुलांचे आणि दिव्यांग लोकांचे पैसे घेत नाहीत. त्याचबरोबर आजूबाजूच्या शहरातील लोकांकडून अधिकचे पैसे सुध्दा घेत नाहीत.