या देशी गायींचे पालन करा, व्हालं मालामाल, घरी वाहणार दुधाची नदी

| Updated on: May 17, 2023 | 8:10 PM

गीर गाय एक देशी जाती आहे. ही गाय अधिक दूध देते. हिचा दूध जास्त महाग आहे. या जातीची गाय गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानात दिसते.

या देशी गायींचे पालन करा, व्हालं मालामाल, घरी वाहणार दुधाची नदी
Follow us on

मुंबई : देशात शेतीसोबत पशुपालन केले जाते. देशात करोडो लोकांची उपजीविका पशुपालनावर अवलंबून आहे. पशुपालनाशी संबंधित तूप, दही, दूध, ताक विकून शेतकरी चांगली कमाई करत आहेत. त्यातून त्यांचा घरचा खर्च भागवला जातो. परंतु, शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या असते ती म्हणजे कोणत्या जातीची गाय पाळायची. ज्यामुळे अधिक दुधाचे उत्पादन होईल. कारण काही शेतकऱ्यांना याची माहिती नसते. अधिक दूध देणाऱ्या गायींची कोणती जात चांगली असते. आज आम्ही तुम्हाला अशा तीन गायींबदद्ल सांगणार आहोत. अशा गायी ज्या जास्त दूध देतात.

बहुतेक राज्यात सरकार गोपालन करण्यासाठी अनुदान देतात. यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये मोफत दिले जातात. काही राज्यात गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. छत्तीसगड सरकार शेतकऱ्यांचे शेण आणि गोमूत्र खरेदी करत आहे. या मोबदल्यात शेतकऱ्यांना करोडो रुपये दिले जात आहेत. शेतकऱ्यांना दुधापासून मिल्क प्रोडक्शन मिळते. शेण आणि गोमूत्र विकून पैसे कमाऊ शकतात. माहिती करून घेऊया तीन महत्त्वाच्या गायींच्या जास्त दूध देणाऱ्या जाती.

हे सुद्धा वाचा

गीर गाय : गीर गाय एक देशी जाती आहे. ही गाय अधिक दूध देते. हिचा दूध जास्त महाग आहे. या जातीची गाय गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानात दिसते. ही गाय मुळची गुजरातची आहे. ही गाय रोज १५ ते २० लीटर दूध देते. गीर गायीचे पालन केल्यास चांगली कमाई होऊ शकते.

साहीवाल गाय : साहीवालही देशी गाय आहे. या गायीचा मूळ उगम पाकिस्तानचा आहे. शरीर लांब असतो. ही गाय १० ते २० लीटर दूध देते. योग्य काळजी घेतली तर या गायीची दूध देण्याची क्षमता वाढते. साहीवाल गायीला शेतकरी उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये पालन करतात.

लाल सिंधी गाय : या गायीचा मुळ उगम पाकिस्तानच्या सिंध प्रातातील आहे. परंतु, हरियाणा, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील शेतकरी या गायी पाळतात. ही गाय १२ ते २० लीटर दूध देते. शेतकरी लाल सिंधी गायीचे पालन करत असतील तर दूध विकून चांगली कमाई होते.