लासलगाव : संकटे आली की ती चोही बाजूंनी येतात अगदी त्याप्रमाणेच यंदा (Vineyard) द्राक्ष बागांबाबत झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून संकटाची सुरु असलेली मालिका आता अंतिम टप्प्यात अधिकच गडद होत आहे. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे बागांची जोपासना केली तर कुठे पीक पदरात पडते अशी अवस्था ही द्राक्ष बागांची. यंदा मोहर लागण्यापासून संकटे सुरु आहेत. (Untimely Rain) अवकाळी पावसामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी सध्या वाढती (Winter) थंडी आणि वटवाघळांचा उपद्रव यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होत आहे. थंडीपासून घडकूज होऊ नये म्हणून बागांमध्ये शेकोट्या पेटवल्या जात आहेत तर आता वटवाघळांमुळे बागांतील प्रत्येक द्राक्षाच्या घडाची निघराणी करण्याची नामुष्की ही शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. वर्षभर अथक परिश्रम आणि एकरी लाखोंचा खर्च करुनही फळ पदरी पडते की नाही अशी आवस्था द्राक्ष बागांची झाली आहे.
सध्या थंडीची लाट आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तर पारा 4 अंशावर गेला आहे. असे असताना थंडीमुळे घडकूज होती म्हणून शेतकरी हे हुडहुडी भरत असताना मध्यरात्रीही शेत जवळ करीत आहेत. बागांमध्ये शेकोट्या पेटवून वातावरण दमट करण्याचा केवीलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. हे संकट कमी म्हणून की काय, आता वटवाघळांचा उपद्रव वाढलेला आहे. वटवाघुळ रात्रीच्या वेळी काळ्या द्राक्षांवर येऊन बसत असल्याने मोठ्या प्रमाणात वटवाघुळ या द्राक्षांचे नुकसान करत असल्याने परत एकदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला नवीन संकटाला सामोरे जाताना दिसत आहे. त्यामुळे संकटाची मालिका तर सुरु आहेच पण याचा शेवट कधी होणार असाच सवाल शेतकऱ्यांच्या मनात आहे.
सध्या राज्यात थंडीची लाट आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊसही होत आहे. असे असताना द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यामध्ये थंडीचा पारा दिवसान दिवस कमी होत 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्याने याचा फटका द्राक्ष पिकांना बसत असल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी पहाटे उठून शेकोट्या पेटवून द्राक्षबाग वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. आतापर्यंत पावसामुळे नुकसान झाले आहे पण थंडी ही पिकांना पोषक असतानाही त्यामध्ये प्रमाणापेक्षा वाढ झाल्याने नुकसान होत आहे.
सध्या द्राक्ष ही काढणीच्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी काढणी ही सुरु आहे. मात्र, या दरम्यानच वाढत्या थंडीबरोबर आता वटवाघळांचाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. कारण, आता रात्रीच्या वेळी वटवाघळं देखील या काळ्या द्राक्ष वरून बसून द्राक्षे खात असल्याने द्राक्षाचे घड खाली पाडून देत असल्याने या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात हे वटवाघूळ नुकसान करत असल्यान त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादनावर होणार आहे.
Kharif Season : खरिपातील शेतीमालाची आवक वाढली, आता दर्जानुसार मिळणार दर
चोरट्यांनी हेही सोडलं नाही, रात्रीतून 20 टन टरबुज लंपास, 75 दिवसांची शेतकऱ्याची मेहनत मातीमोल
Untimely Rain: अवकाळीची अवकृपा सुरुच, आता थेट उत्पादनावर परिणाम