प्रतिनिधी, मुंबई : रोजगाराच्या शोधासाठी गावातील लोकं शहरात जाऊ लागले आहेत. यामुळे शहरात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरात खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होत आहेत. बरेच पैसे खर्च करूनही शुद्ध जेवण मिळत नाही. एवढेच नाही तर हिरवी मिरची, सांभार, अद्रक आणि लसूणही सेंद्रीय मिळत नाही. यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शहरात राहणारे आपल्या फ्लॅटवर किंवा घरी मसाल्याची पिकं घेऊ शकतात. यामुळे त्यांना सेंद्रीय आणि शुद्ध आहार मिळेल. तसेच पैशांची बचत होईल. खाली दिलेली पद्धत पिकांचे उत्पादन करण्यासाठी वापरू शकता.
हळद : हळदीशिवाय भाजी होऊ शकत नाही. कोणत्याही भाजीत हळदीचा उपयोग होतो. हळदीत भरपूर औषधी गुणधर्म आहेत. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. छतावर हळदीची लागवड करू शकता. हळदीला पाच ते सहा तास उन्हाची गरज असते. यामुळे हळदीचे उत्पादन चांगले येते. लावल्यानंतर ६ ते ८ महिन्यांनंतर हळदीचे उत्पादन निघते.
सांभार : घरीसुद्धा सांभार लावता येऊ शकतो. कोणत्याही ऋतूत याची लागवड करता येते. खत म्हणून शेणाचा वापर करू शकता. दर महिन्याला तुम्ही सांभाराची हिरवी पाने तोडू शकता.
हिरवी मिरची : दाळ असो की, भाजी तडका लावण्यासाठी मिरचीची गरज पडते. मिरचीच्या लागवडीसाठी शेणखताशिवाय कोकोपीटचा वापर करू शकता. यामुळे रोपाची ताकत वाढते. मिरची लावल्यानंतर काही महिन्यांनी मिरचीचे उत्पादन घेता येते.
जीरा : जीरा हासुद्धा एक मसाला आहे. याशिवाय किचन अपुरा असतो. कोणत्याही भाजीला जीऱ्याची फोडणी द्यावी लागते. सेंद्रीय पद्धतीने लावल्यास जीरा लाभदायक असतो. शेणखत आणि कोकोपीटमध्ये जीरा लावता येऊ शकतो. मध्यंतरी पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास जीऱ्याचे उत्पादन चांगले येते.