नवी दिल्ली : इटावा येथील रहिवासी रामसिंह राठोड यांनी काटेरी वनस्पती असलेल्या जमिनीत फळांची (Orchard Cultivation) शेती (Agriculture) केली. पेरुचे त्यांनी २०० रोप लावले. अनारचे १९०, तर लिंबूचे १०० रोप लावले. यावेळी आपल्या शेतातील उत्पन्न मोफत वाटत आहेत. त्यांच्या मते, यातून पुढच्या वर्षी सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न होईल. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वय महत्त्वाचे नाही. शेतीसाठीही ही गोष्टी लागू होते. इटावा येथील ७० वर्षीय राम सिंह राठोड यांनी असंच काहीतरी वेगळं केलंय. इटावा हे ठिकाणी यमुना आणि चंबळ नदीच्या खोऱ्यात बसलेलं आहे. बाबूळशिवाय काटेरी वनस्पती आहेत. दुसरी शेती केल्यास खूप मेहनत करावी लागते.
रामसिंह राठोड शहरात दुकान चालवत होते. दरम्यान त्यांनी कामेट गावात जमीन खरेदी केली. जमिनीच्या मागे भूमाफिया लागले. जमिनीच्या संरक्षणासाठी रामसिंह शेतात घर बांधून राहू लागले. शेतीला कुंपण केले. काही भागात मोहरीची लागवड केली. त्यानंतर शेतीत त्यांना आवड निर्माण झाली. त्यामुळं त्यांनी २०० पेरुचे, १९० अनारचे तर १०० रोप ही लिंबूचे लावले. ही लागवड सुमारे दीड एकर जागेत केली.
शेतात पाण्याची कमतरता होती. त्यामुळं रामसिंह राठोड यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. थेंब-थेंब पाणी रोपांना मिळते. वर्षभर पहारेदारी केल्यानंतर त्यांनी सुमारे ५०० रोपांची लागवड केली.
रामसिंह यांनी पेरुसह इतर फळांची लागवड केली आहे. पहिलं उत्पन्न त्यांनी गरजू, नातेवाईक तसेच मित्रमंडळींना मोफत दिलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार पुढच्या वर्षीपासून ते दरवर्षी सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतील.
कोणतीही गोष्ट कठीण नसते. मन लावून केल्यास त्यात यश मिळतेय. त्यासाठी वयाचेही बंधन नसते. त्यामुळं सुखी आणि समृद्धीचा मार्ग हा व्यक्तीच्या विचारातून जातो. रामसिंह राठोड यांचे वय आता ७० आहे. याही काळात त्यांनी शेतीचं काम सुरू केलं. त्यामुळं कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसते, हेच यातून दिसून येते. या इटावा येथील शेतकऱ्याकडून शिकण्यासारखं बरचं काही आहे.