Farmer Success Story : सिव्हिल इंजिनीअर होण्याची संधी मिळाली होती, लाल केळीची शेती सुरू केली, फक्त 4 एकरात 35 लाख रुपये कमावले

| Updated on: Jul 06, 2023 | 1:17 PM

MAHARASHTRA FARMER : सोलापूरच्या एका तरुणाची सगळीकडं चर्चा सुरु आहे. तो सिव्हिल इंजिनीअर असून देखील शेती करीत आहे. त्याने लाल केळीची यशस्वी शेती केली आहे. त्यामुळे तो लाखो रुपये कमावत आहे.

Farmer Success Story : सिव्हिल इंजिनीअर होण्याची संधी मिळाली होती, लाल केळीची शेती सुरू केली, फक्त 4 एकरात 35 लाख रुपये कमावले
red banana
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सोलापूरमधील (Solapur) युवा शेतकरी अभिजीत पाटील (farmer abhijeet patil) सध्या अधिक चर्चेत आहे. अभिजीतने सिव्हिल इंजिनीअर आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर अभिजीत नोकरीच्या मागे धावला नाही, त्याने शेती करण्याचं ठरवलं. सुरुवातीला त्याने तिथल्या शेतीची पुर्णपणे माहिती घेतली. त्यानंतर त्याने आधुनिक पद्धतीने शेती (Farmer Success Story) करण्याचा निर्णय घेतला. सध्या अभिजीतने लाल केळ्याची शेती केली आहे. चार एकरात त्याने शेती केली आहे, तिथं त्याला लाख रुपयांची कमाई केली आहे.

तीन वर्षापुर्वी…

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अभिजीत पाटील या तरुणाने त्यानं इंजिनिअरींगचं शिक्षण डीवाय पाटील कॉलेज, पुण्यातून घेतलं आहे. २०१५ मध्ये त्याने शेती करायचा निर्णय घेतला होता. सात ते आठ वर्षात त्याने शेतीत नवनवीन प्रयोग केले. डिसेंबर २०२० मध्ये अभिजीत पाटील यांनी चार एकर जमिनीत लाल केळ्याची शेती केली. सध्या अधिक फायदा मिळत असल्यामुळे त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे.

सुरुवातीला ज्यावेळी त्याने उत्पादन घेतलं, त्यावेळी माल कुठल्याही बाजारात न विकण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याचे मार्केटींग कौशल्य वापरले आणि पुणे, मुंबई, दिल्ली येथील रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये केळी विकली.

हे सुद्धा वाचा

चार एकरात ६० टन केळी

अभिजीत पाटील यांनी चार एकरात ६० टन केळीचं उत्पादन घेतलं आहे. सगळा खर्च काढला तर त्यांना ३५ लाख रुपयांचा फायदा झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून मेट्रो शहरातील उच्च वर्गात लाल केळीची चांगली लोकप्रिय झाली आहे.

लाल केळ्याची किंमत…

इतर केळीपेक्षा लाल केळीचा सध्या चांगला दर मिळत आहे. त्याचा दर ५० ते १०० रुपये असा आहे. लाल केळीचं झाडं मोठं असतं. त्याचबरोबर ते गोड सुध्दा असतं. एका फनीमध्ये ८० ते १०० केळी असतात. त्याच वजन १३ ते १८ किलोच्या दरम्यान असतं.

आरोग्यासाठी लाल केळी अधिक फायद्याची

लाल केळी आरोग्यासाठी अधिक फायद्याची आहे. त्याची साल लाल आहे, त्याचबरोबर त्याचं फळ काही प्रमाणात पिवळ्या रंगाचं आहे. त्यामध्ये सुगर मर्यादीत असते. त्याचबरोबर ही केळी कॅन्सर आणि ह्दय रोगापासून लोकांना दूर ठेवते. रोज एक केळ खाल्ल्याने सुध्दा आवश्यक असलेली उर्जा निर्माण होते. ही केळी खाल्ल्याने मधुमेह हा आजार होण्याची शक्यता अधिक कमी असते.