रत्नागिरी : महिन्याकाठी होत असलेला (Untimely Rain) अवकाळी पाऊस आणि आता उष्णतेची लाट हे सर्वकाही आंबा उत्पादकांसाठी नुकासनीचे ठरत आहे. (Hapus Mango) हापूसच्या तिसऱ्या टप्प्यातील आंबा 15 एप्रिलपासून मुबलक प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आंबा खवय्यांसाठी हापूसची मनसोक्त चव चाखण्यासाठी अणखी 10 दिवासांची वाट पहावी लागणार आहे. कारण सध्या (Maharashtra) राज्यातील मुख्य बाजारपेठेत फळांच्या राजाचे आगमन झाले असले उत्पादन घटल्याने आवक ही कमीच आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात हापूस आंबा सर्वच बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे हापूस बाहेरून भाजत असून आतून तो पांढरा होण्याची भीती आहे. मात्र, सध्या अल्प प्रमाणात आवक असल्याने दर हे चढेच आहेत. 25 एप्रिलनंतरच आवक मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंब्याला मोहर लागला होता. च्याच दरम्यान काही प्रमाणात फळंही लागली मात्र, अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराईत सापडून गळून गेली. तेव्हापासून सुरु झालेली अवकाळीची अवकृपा सध्याही कायम आहे. मध्यंतरीच झालेल्या पावसामुळे आंबागळ तर झालीच पण न भरुन निघणारे फळबागायत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता 15 एप्रिल पासून मुबलक प्रमाणात आंबा बाजारपेठेत उपलब्ध होणार होता पण अवकाळीनंतर उन्हाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे आंब्याच्या दर्जावर त्याचा परिणाम झाला आहे. आता 25 एप्रिल नंतर आवक वाढेल असा अंदाज आहे.
सध्याही वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक होत आहे. मात्र, कमी प्रमाणात आवक होत असून सध्याचे दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे आहेत. गेल्या दीड महिन्यापासू हापूसची आवक सुरु झाली आहे पण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने दर वाढलेले आहेत. अजून 10 दिवस असेच दर राहतील. मे च्या पहिल्या आठवड्यापासून दरात काही प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे.
कोकणातून वाशीसह इतर मुख्य बाजारपेठांमध्ये हापूस दाखल होत आहे. पण मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी आहे. दरवर्षी गुढीपाडव्यापर्यंत वाशी मार्केटमध्ये 1 लाखाहून अधिक पेट्यांची आवक होत असते यंदा मात्र, आतापर्यंत 20 हजार पेट्याच कोकणातून जात आहेत. 5 डझन पेटीचा दर हा 5 हजार रुपये आहे. त्यामुळे 10 दिवस थांबूनच सर्वसामान्यांना हापूसची चव चाखावी लागणार आहे.