मुंबई : वाढत्या उन्हाच्या झळा ह्या दुपारनंतरच नाही तर दिवसा उजाडताच सुरु होत आहे. (India Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून सध्या सूर्य उजाडताच आग ओकतोय अशी अवस्था झाली आहे. 121 वर्षात यंदाचा (March Month) मार्च महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे. (Summer Season) उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला आहे. शिवाय एप्रिल महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या बाबतीत तर मार्च महिन्याने 121 वर्षातील सर्वच विक्रम मोडलेले आहेत. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्यात काय अवस्था होणार हे पहावे लागणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मार्च महिन्यात संपूर्ण देशाचे कमाल तापमान सामान्यपेक्षा 1.86 अंश सेल्सिअसने वाढल्याचे समोर आले. वायव्य प्रदेशात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, 1901 पासून दिवसाच्या तापमानाच्या बाबतीत मार्च महिना हा सर्वाधिक उष्ण महिना नोंदवला गेला आहे.
देशात गेल्या आठ दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. याचा जीवनामानावरही परिणाम झाला आहे. असे असतानाच आता एप्रिल महिन्यातही अशाच प्रकारे तापमानामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.21 मार्चला 39.0 अंश सेल्सिअस, 22 मार्चला 34.8 अंश सेल्सिअस,, 23 मार्चला 38 अंश सेल्सिअस, 24 मार्चला 37.3 अंश सेल्सिअस, 25 मार्चला 37.5अंश सेल्सिअस,, 26 मार्चला 37.6, 27 मार्चला 38 अंश सेल्सिअस, 28 मार्चला 39.3 अंश सेल्सिअस अशा प्रकारे तापमानाची नोंद झाली आहे.
यंदा मार्च महिन्यामध्येच देशात सर्वत्र कमाल तापमानात अधिकची नोंद झाली आहे. 1901 नंतरची ही सर्वाधिक वाढ असल्याचे मानले जात आहे. वायव्य भारतामध्ये मार्चमध्ये सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा 3.91 अंश सेल्सिअसने अधिक होते. 1901 नंतर अशाप्रकारे तापमानात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. याचा परिणाम आता थेट मानवी जीवनावर होऊ लागला आहे. त्यामुळे भर सणासुदीच्या काळातही शहरातील मुख्य रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. दिवासा बाजारपेठेत शुकशुकाट आणि रात्रीच्या वेळी गजबज होत आहे. सर्वकाही वाढत्या उन्हाचा परिणाम आहे.
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसला असला तरी सर्व देशाची ही परस्थिती नाही. एकूण पावसाची नोंद ही 8.9 मिमी झाली आहे जी 1961-2010 या दरम्यानच्या काळात 30.4 मिमी झाली होती. यामध्ये सरासरी पावसामध्ये मोठी घट झाली आहे. यापूर्वी मार्च 1909 मध्ये 7.2 मिमी आणि 1098 मध्ये 8.7 मिमी अशाप्रकारे सर्वात कमी पावसाची नोंद झाली होती. पावसाचे घटते प्रमाण असतानाच गतवर्षी मार्च महिन्यामध्ये 32.9 अंश सेल्सिअस तापमानात वाढ झाल्याने यापूर्वीचे 11 वर्षातील विक्रम मोडले गेले होते. आयएमडीच्या माहितीनुसार गुरुवारी 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती जी सरासरीपेक्षा 6 अंशानी जास्त होती. तर किमान तापमान हे 20.01 अंश सेल्सिअस होते. हे तापमान देखील 2 अंशानी वाढेलेले आहे. मार्च महिना संपला असला तरी उष्णतेची लाट ही कायम आहे. उत्तर भारतामध्ये ऊन्हाच्या अधिक झळा असून गुरुग्रामचे 41.4 नजफगड 40.6, जाफरपूर 40.6, नरेला 41.6, पितामपुरा 41.1 अशी तापमानाची नोंद झालेली आहे.
Drip Irrigation : सरकारचा एक निर्णय अन् लाखो शेतकऱ्यांचा फायदा, उत्पादनवाढीसाठी काय आहे धोरण?
मक्याच्या दरात वाढ फायदा तांदूळ उत्पादकांना, रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतीय शेतीमालाला मागणी