नाशिक : नाशिकच्या (NASHIK) कळवण, सुरगाणा येथील घाट माथ्याला लागून असलेल्या भागाला पावसाने (MAHARASHTRA RAIN UPDATE) चांगलेच झोडपले आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांची छते देखील उडाली आहेत. कनाशी, अभोना, बोरगावसह परिसराला पावसाने झोडपले असले, तरी उकाड्यापासून हैराण झालेल्यांना काहीशा (MANSOON RAIN UPDATE) दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातील देवळा, कळवण, बागलाण तालुक्यांत मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार आणि कुठे पावसाच्या हलक्या सरी झाल्याने बळीराजा सुखावला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावासाने ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेकांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी हा पाऊस योग्य असल्याचे सांगत पेरणीची तयारी करण्यास सुरवात केली होती.
छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पहिल्यांदाचं पाऊस आल्यामुळे औरंगाबादकर नागरिक ही सुखावून गेले, मुसळधार पडत असलेल्या पावसाचा औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील व्हिडीओ समोर आलेला आहे. जालना रोडवरच्या पादचारी पुलावरून घेतलेला व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेतोय. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर रांगा लागल्या होत्या.
लांबलेल्या मान्सूनमुळे शेतकरी राजा हताश झाल्याचं चित्र रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कोरड्या वातावरणामुळे खरीपाच्या पेरण्या लांबवणीवर पडल्या आहेत. अनेकांच्या नजरा मान्सून कधी येणार याकडे लागल्या आहेत. तर अजूनही पेरणी करण्यासाठी शेतकरी धजावत नाहीयेत.
बीडच्या धारूर परिसरात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यात गोपाळपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय सौर उर्जे सह इतर साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.