रत्नागिरी : ज्या (Kokan Rain) कोकणातून राज्यात पाऊस दाखल झाला आहे त्या कोकणावर वरुणराजाची कृपादृष्टी राहिलेली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अधिकचा पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून (Maharashtra) राज्यात मान्सून सक्रीय झाला असला तरी कोकणाला झुकते माप दिल्यानेच रत्नागिरी जिल्ह्यातील 30 अधिक धरणे ही ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे पण पाणीपातळीत वाढ झाल्याने पिकांचीही चिंता मिटली आहे. (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे शिवाय फळबागांनाही याचा मोठा आधार आहे. राज्यात सर्वात प्रथम मान्सूनने कोकणवर कृपादृष्टी दाखवली असून अद्यापही पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सरासरीपेक्षा अधिक साठा झाला आहे.
कोकणातील जलसाठा मध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 30 हुन अधिक धरणे सध्या भरली असून जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खेळ धरणासह परमेश्वर तालुक्यातील गडनदी, खेड तालुक्यातील नातूवाडी, राजापूर तालुक्यातल्या पूर्व भागातील अर्जुना धरण, लांजा तालुक्यातील खोरनिनको धरणासह सर्वच छोटी मोठी धरणे यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणाच्या सांडव्यावरून सध्या पाणी ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसामध्ये सातत्य राहिल्याने हा परिणाम झाला आहे.
राज्यात कोकणातूनच मान्सूनचे आगमन होते. पण मध्यंतरी मान्सूनने लहरीपणा दाखविला असल्याने हंगामात काय होणार असा सवाल उपस्थित झाला होता. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पाऊस सक्रीय तर झाला आहेच शिवाय रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणीपुरठा होतो.या धरणातही सरासरी एवढा पाणीसाठा झाल्याने शहराला आता पाणीटंचाई भासणार नाही. शिवाय पावसामध्ये सातत्य आहे.
हंगामाच्या सुरवातीला काही मर्यादीत क्षेत्रावर बरसणाऱ्या मान्सूनने आता महाराष्ट्र व्यापला आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना तर जीवदान मिळाले आहे. पण आता उत्पादनात वाढ होईल असा आशावाद आहे. निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून गायब होता पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून केवळ सक्रीयच झाला असे नाहीतर त्यामध्ये सातत्य देखील राहिलेले आहे.