नाशिक – येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रासह (maharashtra) अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Weather department)वर्तवण्यात आली होती. त्यामुळे काल राज्यात अनेक ठिकांणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. अशा वातावरणामुळे हवामानात उकाडा प्रचंड वाढला असल्याने नागरिकांना काल उकाड्याचा प्रचंड त्रास झाला असणार त्याचबरोबर निफाड (niphad) परिसरात दिवसभर आभाळ दाटून आलेलं होत. नागरिकांना काल उकाड्याचा प्रचंड त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सायंकाळच्या सुमारात काल परिसरात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. 20 मिनिटे पडलेल्या पावसाने परिसरात रात्री लोकांना चांगला गारवा जाणवला तर उकाड्यापासून सुटका झाली. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक पीकांवर त्याचा परिणाम होणार आहे. काढणीला आलेल्या पीकांवर पाऊस झाल्याने नेमकं कोणत्या पिकाचं नुकसान झालंय हे उद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शेतक-यांचं नुकसान
नाशिक जिल्ह्यात काल दिवसभर आकाशात आभाळ असल्याने जिल्ह्यात अनेकांना उकाड्याचा त्रास झाला. पण रात्री पडलेल्या पावसाने अनेकांना दिलास दिला परंतु शेतक-यांच्या पीकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या कांदा,गहू आणि द्राक्ष या पिकांना झालेल्या पावसाचा फटका बसला असल्याची अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. कारण झालेल्या पावसामुळे आत्तापर्यंत अनेकांचे नुकसान झालेले पाहायला मिळते. कोरोनाच्या काळातून आता कुठे शेतकरी सावरायला लागला होता. परंतु हवामान बदलाचा परिणाम पुन्हा शेतीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे.हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार काल पाऊस झाला आहे.
हवामान वेधशाळेने वर्तविलेला होता अंदाज
संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात काल आणि आज गारपिटीची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय.महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तसेच अनेक ठिकाणी पावसाची हजेरी देखील असेल.