सांगली : सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. सांगली (sangali) जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. गारीसह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडं उन्माळून पडली आहेत. झाडे रस्त्यात कोसळल्याने अनेक मार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून, या अवकाळी पावसाचा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे अंब्यासह इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. सोबतच उन्हाळी बाजरी, ज्वारी, यासारख्या पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. गारपिटीच्या पावासामुळे पिकांचे नुकसान झाल्याने, बळीराजा संकटात सापडला आहे. दुसरीकडे राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे, काल झालेल्या पवासामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसासोबतच गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र दुसरीकडे काल इगतपुरी तालुक्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो, भावली, धामडकी, जामुंडे, गव्हांडेसह अनेक भागामध्ये एकते दीड तास वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. तालुक्यातील भावली, पिंपरी, धामडकी या गांवामध्ये एवढी गारपीट झाली की, जमिनीवर बर्फाची पांढरी चादर पसरल्याचे पाहायला मिळाले.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. पावसासोबतच गारपीट देखील झाली. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैरान आहेत. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना काही प्रमाणात का होत नाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज देखील पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.