मुंबई : मधमाशा संगोपनातून स्वयंपूर्ण गाव ही (Village of Honey) मधाच्या गावची संकल्पना आहे. (Honey) मधमाशा संगोपनासाठी गावाने घेतलेला पुढाकार पाहता या गावात व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. यापूर्वीही मधाचं गाव ही संकल्पना सातारा जिल्ह्यातील मांगर गावातच राबवली गेली होती. यंदाही याच गावची निवड झाली आहे. या संकल्पनेतून वर्षभरात 1 लाख किलो मध गोळा केला जातो. केवळ (Industry building) उद्योग उभारीसाठीच नाही तर मधमाशांची घटती संख्या ही शेती व पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तसेच निसर्गाचा समतोल कायम ठेवण्यासाठी मधमाशांचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी ‘मधाचे गाव’ ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात राबवली जाते.
मधमाशी पालन व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून उद्योग खात्याचाही पुढाकार राहिलेला आहे. या वर्षभराच्या कालावधीसाठी 27 हजार पेट्या मधमाशा पाळण्यासाठी दिल्या जातात. या व्यवसायातील मुख्य खर्चच उद्योग खात्याने घेतला आहे. त्यामुळे स्वंयरोजगार उपलब्ध होण्यासाठी ह्या व्यवसायाचा उपयोग होऊ शकतो.यामधून गावस्तरावर तरुणांच्या हाताला कामही मिळते आणि ग्रामीण भागात एखादा उद्योगही उभा राहतो.
यंदा मधांच गाव संकल्पना ही महाबळेश्वर जवळील मंगार गावापासून केली जाणार आहे. 16 मे पासून या संकल्पनेला मंगार येथे सुरवात होत आहे. मधमाशांचे संगोपन यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्यभर राबविण्यात येणारी योजना मांघर या गावापासून सुरू होत आहे. गावातील लोकांना शासनाच्या विविध योजनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच निसर्गपर्यटन आणि मधमाशा संगोपनातून स्वयंपूर्ण गाव ही मधाच्या गावाची संकल्पना आहे.
मध व्यवसाय अनेकांना याबाबत माहिती नसली उद्योग खात्याने पुढाकार घेऊन आर्थिक मदत शिवाय 1 लाख किलो मध गोळा करण्याचे उद्देशही राहते. आतापर्यंत व्यवसायाच्या स्वरुपातून याकडे पाहिले जात नव्हते पण आता उद्योग खात्यामुळे याला अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. या मधाचे गाव संकल्पनेतून विविध कार्यक्रमात स्थानिक मधपाळांना मधपेट्या वाटप करण्यात