लातूर : यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांचे लक्ष आहे ते उत्पादनवाढीच्या अनुशंगाने. त्यामुळे मुख्य पिकांचे क्षेत्र घटले आहे तर तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचा अहवाल नुकताच केंद्र सरकारने जाहीर केला आहे. उत्पादन वाढीसाठी पश्चिम महराष्ट्रासह मराठवाड्यात (Watermelon-Melon) टरबूज आणि खरबूजाचेही क्षेत्र वाढत आहे. मात्र, योग्य (Management) नियोजन आणि लागवड करताना योग्य वाणांची निवड हेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. (Agricultural University) कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेले वाण तसेच एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. देवराव देसरकर यांनी दिला आहे. काळाच्या ओघात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही पीक पध्दतीमध्ये बदल स्वीकारलेला आहे. आता गरज आहे ती उत्पादन वाढीची. त्यामुळे बदला बरोबर योग्य नियोजनाची गरज आहे.
टरबूज-खरबूदज हे हंगामी पीक असून याच्या लागवडीसाठी मध्यम, काळी व पाण्याचा योग्य निचरा होणारी शेत जमिन निवडणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी एकाच जागी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय 15 फेब्रुवारीपर्यंत याची लागवड करता येते. मात्र, लागवड करण्यापूर्वी सर्वात महत्वाचे बियाणे 12 तास पाण्यात भिजवून लागवड करावी. टरबूजाची लागवड करताना अर्का माणिक, दुर्गापूर केशर, पुसा बेदाणा, शुगर बेबी, अर्का मधू या वाणांची तर खरबूजासाठी अर्का राजन, काशी मधू, हरा, अर्का जीत, पूसा मधू या वाणांची निवड केल्यास अधिकचे उत्पन्न मिळणार आहे.
लागवड करताना कॉपर ऑक्झिक्लोराईड या बुरशी नाशकाची 3 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. जोपासणा करताना एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन पध्दत ही महत्वाची आहे. उन्हाळी हंगामात किडीचा प्रादुर्भाव कमी असला तरी योग्य वेळी पाणी आणि मशागत यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. हे गणितच लक्षात ठेऊन शेतकऱ्यांनी कमी कालावधीमधील या पिकांतून अधिकचे उत्पन्न घेणे गरजेचे आहे. काळाच्या ओघात कमी काळात अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी टरबूजाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांसमोरील अव्हानेही वाढत आहेत.
जनावरांसाठी दुय्यम चारा म्हणून मका, कडवळ असाच चारा जनावरांना दिला जातो. मात्र, अशा चाऱ्यामधून शरीर पोषण व दुग्धोत्पादनासाठी असणारी पोषण तत्वाची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे पशूंच्या खाद्याचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. यामुळे प्रतिलिटर दुग्धोत्पादनात प्रतिकोलो वजनवाढ यावरील खर्च वाढतो. त्यामुळे सकस चारा उत्पादन केल्यास जास्त पोषणमुल्ये पुरवठा करुन पशू खाद्यावरील खर्च कमी करण्यात येत असल्याचे डॉ. अनिता जिंतूरकर यांनी सांगितले आहे.
बळीराजाचं मरण कधी थांबणार? विदर्भातला आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढला
Rabbi Season : रब्बी हंगामातही तेलबियांचे क्षेत्र वाढले, मुख्य पिकांना शेतकऱ्यांनी डावलले
Papaya : पपईची लागवड साधली की उत्पन्नाची हमी, काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला?