पुणे : खरीप हंगामात (Crop Insurance) पीकविमा कंपन्यांचा मनमानी कारभार झाला असला तरी (Rabi Season) रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग हा वाढलेलाच आहे. पीकविमा योजनेत सहभागी होऊन देखील राज्यातील तब्बल 84 हजार शेतकऱ्यांना खरीपचा विमा हा मिळालेला नव्हता. त्यामुळे तक्रारी आणि (Farmer) शेतकऱ्यांचे दावे ही प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे. असे असताना दुसरीकडे रब्बी पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी कंपन्यांकडे तब्बल 677 कोटी रुपये हे अदा केले आहेत. रब्बीचा पेरा होताच वातावरणातील बदल आणि राज्य सरकारने ‘विकेल तेच पिकेल’ या संकल्पनेवर भर दिल्यामुळेच हा बदल झाला असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहवयास मिळत आहे. पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकऱ्यांच्या हीताची असल्याचा विसरच या कंपन्यांना पडतो की काय अशी स्थिती खरीप हंगामाच्या दरम्यान, झाली होती. असे असताना यंदा वातावरणातील बदलामुळे संभाव्य धोका लक्षात घेत 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये 44 हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिक विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तर भरपाई मिळावी या उद्देशाने योजनेत सहभाग हा नोंदवलेलाच आहे.
यंदा रब्बी हंगामातील समीकरणे ही पूर्णत: बदललेली आहेत. एकतर रब्बी हंगातील पिकांचा पेरा महिन्याभराने लांबणीवर पडलेला होता. शिवाय सुरवातीच्या काळात पोषक वातावरण होते म्हणून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून पारंपारिक पिकांपेक्षा बाजारभावात ज्या पिकांचे मुल्य आहे अशाच पिकांचा पेरा केला होता. यामध्ये कडधान्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे ही पिकेही धोक्यात आहेत. संभाव्य धोका लक्षात घेताच शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवलेला आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
निसर्गाचा लहरीपणा असो उत्पादनात सरासरीपेक्षा अधिकची घट असो अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना कायम उपयोग झाला आहे. रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात जोखीम अधिक असते. यंदा मात्र, तसा काहीसा फरकच राहिलेला नाही. वातावरणातील बदल सध्याही सुरुच आहे. त्यामुळे 1 लाख 7 हजार 545 कर्जदार शेतकऱ्यांनी तर 11 लाख 37 हजार 22 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तर या सहभागी शेतकऱ्यांचे 8 लाख 46 हजार 182 हेक्टर क्षेत्र हे विमा संरक्षणात आले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
पारंपरिक पिकांवर कृषी विभागानेच शोधला पर्याय अन् नगर जिल्ह्यात झाला हा बदल, वाचा सविस्तर
Rabi Season: अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट, खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात
Organic Farming: सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला टोमॅटो 400 रुपये किलो अन् वर्षभर उत्पादन