पुणे : (Unseasonal Rain) अवकाळीच्या कचाट्यातून ना खरिपातील पिकांची सुटका झाली ना रब्बी हंगामातील एवढेच काय सर्वाधिक फटका हा (Orchard) फळबागांना बसलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा जाणवत असल्या तरी अवकाळीचा परिणाम काय असतो हे (Mango Fruit) आंबा आणि द्राक्ष बागांकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्यावेळी आंब्याला कैऱ्या लगडणे अपेक्षित होते तिथे आता कुठे मोहर लागला आहे. नोव्हेंबरच्या थंडीमध्ये आंब्याला मोहर लागतो पण या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोहर तर गळालाच शिवाय त्याचे परिणाम अद्यापपर्यंत पाहवयास मिळत आहेत. सध्या आंब्याला कैऱ्या येणे अपेक्षित असताना आता कुठे मोहर अंतिम टप्प्यात आहे. अवकाळीने केवळ खरिपातीलच पिकांचे नाही तर फळबागांचेही मोठे नुकसान केले आहे.
आंबा पिकाचा खरा हंगाम सुरु होतो तो नोव्हेंबर महिन्यात. या महिन्यातील थंडीमुळे आंब्याला मोहर लागण्यास सुरवात होते. ही प्रक्रिया तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आंब्याच्या झाडाला फळ लागते. पण यंदा सर्वकाही अवकाळीने हिसकावले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मोहर लागत असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण क्षमतेने मोहर लागण्यापूर्वीच तो गळाला होता. त्यामुळे आतापर्यंत आंबा फळपिक पोसण्याच्या अवस्थेत असायला पाहिजे होते. तिथे मोहरच लागलेला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे यंदा आंबा उशिराने बाजारपेठेत दाखल होणार आहे. आंबा उशिराने तर दुसरीकडे द्राक्ष उत्पादनात मोठी घट या अवकाळीमुळे झाली आहे.
सध्या फळांचा राजा हापूस हा बाजारपेठेत दाखल झाला असून विक्रमी दर मिळत आहे. सध्या केवळ कोकण भागातील आंबे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. उर्वरीत भागातील आंबे बाजारात दाखल होण्यासाठी अजूनही महिन्याभराचा अवधी लागणार आहे. याचा परिणाम दरावर होणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदा आंब्याच्या दरात वाढ होईल असा अंदाज आहे. शिवाय त्याच्या दर्जावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अवकाळीमुळे वर्षभरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हे नुकासन केवळ वाढीव दरातूनच भरुन निघणार आहे.
Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल