नांदेड: खरिपात झालेले नुकसान (Summer season) उन्हाळी हंगामातून भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक उपाययोजना केल्या मात्र, नैसर्गिक संकटामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका निर्माण झाला होता. यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात (Soybean Area) सोयाबीनचे क्षेत्र वाढले होते. मात्र, पेऱ्यापासूनच निसर्गाचाल लहरीपणा कायम होता. वातावरणातील बदलाचा फटका उन्हाळी हंगामातील सोयाबीनला बसणार असेच चित्र निर्माण झाले होते. परंतू, शेतकऱ्यांनी (Proper Planning) योग्य नियोजन केल्याने अखेर सोयाबीनला फलधारणा झाली आहे. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. यंदा प्रथम बेमोसमी सोयाबीनचा प्रयोग वाढला आहे. पण शिवारात हे पिक बहरु लागल्याने वाढीव उत्पादनाबाबत बळीराजा आशादायी आहे. शेंगा लागण्याच्या अवस्थेत सोयाबीन असून आता धोका टळल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामात भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. शिवाय कृषी विभागानेही योग्य ते मार्गदर्शन आणि पीक पध्दतीमधील बदलाचे महत्व पटवून सांगितल्यामुळे यंदा प्रथमच बेमोसमी सोयाबीनचा पेरा 6 हजार हेक्टरावर झाला आहे. आता सोयाबीनच्या पिकाने शेंगा धरण्यास सुरुवात केली असून पीक फलधारनेने लगडून गेलय.
काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. शिवाय शेतकरी बियाणे उपलब्धतेपासून ते बाजारपेठेचा अभ्यास करीत आहे. गतवर्षी सोयाबीनच्या बियाणांच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे विकतच्या बियाणांऐवजी घरीच बियाणे तयार करुन त्याचाच पेरा केला जात आहे. त्यामुळे होणारी फसवणूकही टळली जात आहे. पेरणी दरम्यानच्या बिजोत्पादन प्रक्रिया करुन शेतकरी चाढ्यावर मूठ धरीत असल्याने उगवण क्षमताही वाढत आहे.
सोयाबीनच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीनची साठवणूक करुन ठेवलेली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनची आवक वाढत आहे. त्यात पुन्हा उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु होणार असल्याने सध्याचे दर टिकून राहतील का नाही हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मार्चमध्ये उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सध्या बहरत असलेल्या सोयाबीनमुळे खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
सोलापूर बाजार समितीत 61 वर्षातील कांद्याची विक्रमी आवक, 1200 गाड्यांची आवक, 16 कोटींची उलाढाल
ठिबक सिंचनातून पाण्याची बचत अन् खताचेही व्यवस्थापन, जाणून घ्या काय आहेत फायदे?
केळीच्या दरात घसरण, आता लागवडीपासूनचे नियोजन गरजेचे, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?