लातूर : सोयाबीनची आवक सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. मात्र, दरातील चढ-उतारामुळे सोयाबीन हे कायम चर्चेत राहिलेले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे तर लातूर येथे (Marathwada) मराठावाड्यातील मुख्य बाजारपेठ. त्यामुळे येथील दरावरच राज्यातील दर ठरतात. यंदा (Soybean Production) सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. उत्पादन घटल्यामुळे दरात वाढ होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही होती. मात्र, हंगामाच्या सुरवातीला (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे घटलेले होते. मात्र, या दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका आता अंतिम टप्प्यातही महत्वाची ठरत आहे. अपेक्षित दर असेल तरच विक्री अन्यथा साठवणूक हा एकसुत्री कार्यक्रम शेतकऱ्यांनी राबवल्याने दरात वाढ झाली होती. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले आहेत. असे असताना देखील दर वाढतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच अजूनही सोयाबीनची साठवणूकीवर शेतकऱ्यांच्या भर आहे. मात्र, घटलेली मागणी आणि आता उन्हाळी सोयाबीनची होणारी आवक यामुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे.
हंगाम सुरु झाला की लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 45 हजार क्विंटल सोयाबीनची आवक ही ठरलेलीच. मात्र, यंदा उत्पादनात घट आणि शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका यामुळे आतापर्यंत 20 हजार क्विंटलपेक्षा अधिकची आवक बाजार समितीमध्ये झालेली नाही. शिवाय सध्या दरही सरासरी एवढाच आहे. लातूरच्या आडात बाजारात सोयाबीनचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. अद्यापर्यंत शेतकऱ्यांना ना अपेक्षित दर मिळालेला आहे ना अपेक्षित आवक झालेली आहे. मध्यंतरी 6 हजार 500 वर गेलेले सोयाबीन महिन्याभरापासून 6 हजार 300 पर्यंत येऊन ठेपले आहे. ज्या मुख्य पिकांवर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे त्या पिकाने अद्यापर्यंत साथ दिलेली नाही.
सध्या दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी संपूर्ण सोयाबीन हे विकलेले नाही. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. त्यामुळे अजूनही सोयाबीन शिल्लक आहे. आता सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे दरात वाढ झाली तरच सोयाबीनची आवक वाढणार आहे. दुसरीकडे उन्हाळी सोयाबीनही जोमात आहे. त्यामुळे त्याची आवक सुरु होण्यापूर्वी खरीपातील सोयाबीन विकणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी यांनी व्यक्त केले आहे.
नगदी पिकांना कोरोनाचा फटका, व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने कलिंगड वावरातच
शेतकऱ्याच असं जुगाड पाहून तुम्हीही होताल अवाक्, तासाभरातच पडीक जमिनही पेरणी योग्य, वाचा सविस्तर
Success Story: दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी