जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : जिल्ह्यात (nandurbar) उन्हाळी हंगामातील (Summer season) शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, ऊस तोडीचा ही हंगाम संपला आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे कामाच्या शोधात गुजरात राज्याकडे कामगारांची वारी निघायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मोठा उद्योग नसल्यामुळे अनेक कुटुंब रोजगारासाठी गुजरात आणि दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर होत असतात. त्यामुळे अनेक गावांमध्ये ओस पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होत असते, जिल्ह्यातील कुटुंब रोजगारासाठी (Agricultural news) दुसऱ्या राज्यात जाऊ नये यासाठी रोजगार हमीतून काम देण्यात येते. मात्र रोजगार हमीतून काम काही दिवसापुरता मिळतं. तर काही काम जेसीबीच्या साह्याने करून घेत असतात, त्यासाठी जिल्ह्यातील कामगार दुसऱ्या राज्यात काम करण्यास पसंत करत आहे. शासनाने रोजगार हमीतून कायमस्वरूपी काम मिळावं अशी व्यवस्था करावी आणि दोन पैसे वाढवून द्यावी त्यामुळे जिल्ह्यातील स्थलांतर काही प्रमाणात कमी होऊ शकतात.
धुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. 15 मे पासून शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहेत, त्यांनी कापूस लागवडीला प्राधान्य दिलं असून, जिल्ह्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण होणार आहे. पाऊस पडायच्या महिनाभर आधी कापूस लागवड केल्यास चांगलं उत्पन्न होतं अशी धारणा शेतकऱ्यांची आहे. कृषी विभागाने एक जूननंतर कापसाचे लागवड करण्याचा आवाहन केलं असलं तरी शेतकऱ्यांनी कापसाचे बियाणे उपलब्ध करून घेतले आहे. लागवडीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर खरीप लागवड क्षेत्रापैकी दोन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते.
नंदूरबार बाजार समित्यांमध्ये सध्या धान्य आणि कडधान्य दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मात्र सोयाबीनचे दर सातत्याने घसरण होत आहे. सोयाबीनची आवक वाढल्यामुळे दरात घसरण होत असल्याच्या व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे. सध्या सोयाबीनला ४ हजार १४० ते ४ हजार ८४५ रुपये दर मिळत आहे. परंतु सोयाबीनचे भाव वाढणार का याची कुठलीही शाश्वती मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती. ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दरापर्यंत पोहोचले होते. यामुळे हंगाम संपल्यानंतर दर वाढीची शक्यता असल्याने शेतकरी योयाबीनसाठा करून ठेवत होते. यंदाही सोयाबीन दर उसळी घेतील असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला आहे.