नांदेड : यंदा (Rabi Season) रब्बी हंगाम महिनाभराने लांबणीवर पडलेला आहे. अधिकच्या पावसामुळे रब्बी पेरणीला उशिर झाला असून त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे रब्बी हंगाम उरकताच शेतकरी आता (Agricultural Cultivation) शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नांगरण, मोगडणी, कुळपणी, रोटरणे यासारखी मशागतीची कामे केली जातात तर पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतजमिनीमध्ये गाळ टाकणे, सुपिकता वाढवणे अशी कामे करुन घेतली जाता. शिवाय (Summer Work) उन्हाळ्यात ही कामे करुन घेण्याचे एक ना अनेक फायदे होत आहेत. काळाच्या ओघात मशागतीमध्ये यंत्राचा वापर वाढला असला तरी आजही शेतकरी बैलजोडीच्या सहायाने ही कामे उरकून घेत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पीक कापणी झाल्यानंतर भर उन्हामध्ये मशागतीचे कामे केली जात आहेत.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली की, शेतकरी शेती मशगतीवर भर देतो. वर्षभर विविध पिके घेतल्याने शेतजमिनीचा पोत खराब झालेला असतो. त्यामुळे खताचा डोस आणि योग्य पध्दतीने मशागत झाली तर उत्पादनात वाढ होणार आहे.शेत जमिनी आता वखरून त्यावर नांगर चालवल्या जातोय. उष्णतेच्या लाटेत जमीन तापली तरच येणारी सुगी चांगली येते, त्यासोबतच कीड आणि अळ्यांचा नायनाट होत असतो. त्यामुळे तळपत्या उन्हात बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.
काळाच्या ओघात शेतीपध्दतीमध्ये बदल झाला असून उत्पादन आणि वेळीची बचत व्हावी म्हणून बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरण्यापासून ते पेरणीपर्यंतची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. असे असले तरी बैलजोडीशिवाय योग्य पध्दतीने शेती मशागत होत नाही असे कही शेतकऱ्यांचे म्हणणे असून ते बैलजोडीच्या मदतीनेच शेती मशागतीची कामे करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या बैलजोडीच्या माध्यमतातून कुळपणी, मोगडणे आदी कामे सुरु आहेत.
शेती मशागतीमध्ये यांत्रिकिकरण वाढले असून त्यामुळे वेळेची बचत होत असली तरी शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुपटीने वाढला आहे. कारण सध्या शेतजमिनीची नांगरट करण्यासाठी एकरी 2 हजार रुपये तर रोटरण्यासाठीही 2 हजार रुपये मोजावेल लागत आहेत. खुरटणी 1 हजार रुपये, पेरणी 1 हजार 500 रुपये, पालकुट्टी 2 हजार 500 रुपये तर हळद काढणीसाठी एकरी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत. प्रत्येक कामामध्ये दर वाढले आहेत.
PMFBY : वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान..! केंद्र सरकारचा मोठा निर्णय?
Central Government : खाद्यतेल, तेलबियांवरील साठामर्यादेच्या कालावधीत वाढ, दरावर काय परिणाम?
Lemon : हंगामी पिकेच शेतकऱ्यांना यंदा तारणार, कलिंगडपाठोपाठ लिंबाला ‘सोन्या’चा भाव