लातूर : शेतीमालाच्या (Prices of Agricultural Commodities) दराचे चित्र कधी कसे बदलेन हे सांगताच येत नाही.आतापर्यंत (Guarantee Rate) हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत तूर आणि हरभऱ्याला अधिकचा दर असल्याने हमीभाव केंद्र ओस पडली होती पण आता अंतिम टप्प्यात दरात मोठा बदल झाला आहे. तूर आणि हरभऱ्याला (Chickpea Crop) बाजार समित्यांपेक्षा हमीभाव केंद्रावर अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे त्यांचा शेतीमाल घेतला जात आहे. शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठच फिरवलेली आहे. पण दरातील तफावत पाहता शेतकऱ्यांनी साठवणूकीसाठी ठेवलेला हरभरा आणि तूर विक्रीला काढली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना चित्र बदलले आहे.
सध्या सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे मात्र तिन्हीही मालाच्या दरात मात्र कमालीची घसरण झाली आहे. गेल्या 15 दिवसांमध्येच हे चित्र बदलले आहे.हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर ठरवून देण्यात आला आहे तर खुल्या बाजारात 6 हजार रुपये क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहे. तर हरभऱ्याची उत्पादकता वाढली असून आवकही तेजीत आहे. असे असले तरी दर मात्र झपाट्याने घसरत आहेत. हमीभाव हा 5 हजार 230 रुपये एवढा आहे तर खुल्या बाजारपेठेत 4 हजार 600 असा फरक आहे. त्यामुळे आता बाजार समित्या ओस तर खरेदी केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे.
15 दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे 7 हजार 200 रुपयांपर्यंत स्थिरावले होते. शिवाय शेतकऱ्यांनीही साठवणूकीतले सोयाबीन विक्रीचा पर्याय निवडला. इथपर्यंत सर्वकाही ठीक होते.मात्र, केंद्र सरकारने साठवणूकीला बंधने आणि सोयापेंडची आयात केल्याने सोयाबीनच्या दरात घसऱण झाली आहे.असे असले तरी शेतकऱ्यांकडील माल हा संपलेला आहे. आता उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होताना दराचे चित्र काय राहणारे हे महत्वाचे आहे.
सध्या शेती मशागतीची कामे सुरु असून शेतकरी बाजारपेठांकडे फिरकतच नाही. याचा परिणाम आता आवकवर होणार आहे. शिवाय हमीभाव पेक्षा कमी दर असल्याने आता खरेदी केंद्रावरच अधकिची गर्दी होत आहे. भविष्यात किमान सोयाबीनचे दर वाढले तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.