नांदेड :ऊस हे सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक असले तरी यंदा ते नुकसानीचे ठरत आहे. यंदाच्या गाळप हंगामास 7 महिने पूर्ण होऊन देखील (Surplus Sugarcane ) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे वजनात घट तर निश्चितच मानली जात आहे पण हंगामात ऊसाची तोड होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल करुन ऊसाची लागवड केली मात्र, पहिल्याच वर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्याने आगामी काळात ऊस लागवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल अशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारखान्यांकडून तोडीचे नियोजन झाले नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे अर्थकारणच विस्कळीत झाल्याचे चित्र केवळ नांदेडच नाही पण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे.
मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस तोडणीची जबाबदारी ही पश्चिम महाराष्ट्रातील 35 कारखान्यांवर देण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला होता. यामुळे काही प्रमाणात का होईना ऊसतोड होईल अशी आशा होती. मात्र, अद्यापपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे ऊसाच्या वजनात तर घट सुरुच आहे. पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊसाची तोड होणार की शेतकऱ्यांनाच ऊस पेटवून क्षेत्र रिकामे करावे लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक अतिरिक्त ऊस हा मराठवाड्यात निर्माण झालेला आहे. कारखान्यांनीही क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. पण शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.
उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके डावलून ऊसाची लागवड केली. मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनीही हे धाडस केले. पण आता ऊसतोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे दर वाढत आहेत. त्यामुळे पारंपरिक पिके चांगली असे म्हणण्याची वेळ आल्याचे नांदेड येथील शेतकरी प्रकाश लोणे यांनी सांगितले आहे.
Orchard Cultivation: पारंपरिक पिकांना डावलून फळबाग क्षेत्रात वाढ,योजनांचा लाभ उत्पादनात वाढ अन्
महागाईच्या वणव्यामध्ये सर्वसामान्यांची होरपळ, Basic गरजांच्या पूर्ततेसाठी तारेवरची कसरत