जालना : शेतकऱ्यांनी प्रतिकूल परस्थितीमध्ये (Summer Season) उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी (Chilly) मिरचीची लागवड केली होती. उन्हाळ्यात मुबलक पाणी शिवाय अवकाळीची अवकृपा नसल्याने पोषक वातावरण आणि सध्या बाजारपेठेतील दर यामुळे सर्वकाही ओके असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. सध्या शिवसेनेच बंडखोर (Shahaji Patil) आमदार शहाजी बापू पाटील यांचा मोबाईलवरील संवाद मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या संवादाला अनुसरुण जिल्ह्यातील भोकरण तालुक्यातील शेतकरी आपल्या भावना व्यक्त करीत आहे. यंदा मिरचीचा ठसका उठणार हे निश्चित मानले जात असून मराठावाड्यातील मिरचेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावडा आणि वालसांगवी भागातील शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.
सध्या राज्यात नव्हे देशात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेली ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. काय झाडी..काय डोंगार..काय हॉटील…एकदम ओक्केच… हे त्या संवादातील वाक्य आता कशालाही जोडून येत आहे. तोच प्रकार भोकरन तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पोषक वातावरण, भरघोस उत्पादन, विक्रमी दर मिरचीच्या बाबतीत सर्वकाही ओक्केच.. अस म्हणत शेतकरी हे हिरव्या मिरचीचे उत्पादन होणारा फायदा याबाबत आनंद व्यक्त करीत आहेत.
जालना जिल्ह्यातील शेतकरी हे रेशीम शेतीबरोबरच भाजीपाल्यावरही भर देत आहेत. उन्हाळी हंगामात लागवड केलेली मिरची आता जोमात असून 15 दिवसांवर तोड आली आहे. यंदा लागवडीपासून पोषक वातावरण राहिले असल्याने उत्पादनात वाढ तर होणारच आहे पण बाजारपेठेत हिरव्या मिरचीला मागणीही आहे. भोकरन तालुक्यातील मिरची ही दिल्ली, अकोला, अमरावती, नागपूरसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही निर्यात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होतो.
उन्हाळी हंगामातील मिरचीची तोड आता 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. अवकाळीचा लहरीपणा नाही की कीड रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात वाढ होणार हे निश्चित आहे. शिवाय सर्वच भाजीपाल्याचे दर हे गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे हिरव्या मिरचीला सध्या 35 ते 40 रुपये असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. तोडीला अद्याप आवधी असतानाही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मागणी करीत आहे. शिवाय पावसाळ्यात मिरचीची आवक कमी राहिली तर दरात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.