मुंबई : केवळ मुख्य पिकांमधूनच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते असे नाही तर हंगामी पिकातूनही कमी कालावधीमध्ये लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडते. यामध्ये मिरची, कांदा, कलिंगड अशा हंगामी पिकांचा सहभाग आहे. त्यामुळेच (Spice farming) मसाला शेतीवर अधिकचा भर आहे. (Chilly Production) मिरची हे त्यामधीलच एक पीक आहे. शेतकऱ्यांना हिरव्या मिरचीमधून उत्पन्न तर मिळतेच पण ही मिरची आरोग्यासाठीही चांगली आहे. यामध्ये जीवनसत्व अधिक असतात. शिवाय (Chilly Export) देशातून मिरचीपासून बनवलेल्या मसाल्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यामध्ये मसाल्यांच्या निर्यातीमधून वर्षाकाठी 21 हजार 500 कोटी रुपयांची उलाढाल यामधून होत आहे. तर मिरची निर्यातीमधून 6 हजार 500 कोटींची उलाढाल होत आहे. गेल्या वर्षी भारतातून एकूण मसाल्याची निर्यात 27 हजार 193 कोटी रुपयांच्या पुढे गेली. यामध्ये मिरचीच्या निर्यातीचा समावेश आहे. याचा फायदा मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.
भारतामध्ये मिरचीचे केवळ उत्पादनच वाढलेले नाही तर निर्यातही त्याच प्रमाणात होत आहे. मिरची उत्पादनात आंध्र प्रदेश हे अव्वलस्थानी आहे. येथील मिरचीची चव, तिखटपणा आणि मसाल्यासाठी अधिकचा वापर यामुळे जगभरात भारतीय मिरचीला अधिकची पसंती आहे. गेल्या १० वर्षांत निर्यातीमध्ये आणि मिळणाऱ्या दरामध्ये सुधारणा दिसून येत आहे. कीटकनाशकांचे अवशेष आणि अॅफ्लाटॉक्सिन नगण्य असल्याचे आढळले.आजपर्यंत, भारतीय मिरची निर्यातीचे जागतिक मिरची व्यापारात 50 टक्क्यांहून अधिक योगदान आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असले तरी तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कर्नाटकमध्ये पिकणाऱ्या ‘बेडगी’ मिरचीचा रंग आणि तिखटपणामुळे जागतिक बाजारात मोठी मागणी आहे. पुसा ज्वाला, सोना-21, जवाहर, सदाहरित, अग्नी, गुंटूर – प्रकासम – कृष्णा प्रदेशात उगवलेल्या ‘तेजा’ आणि ‘गुंटूर संनम’ या जातींमुळे आंध्र प्रदेश भारतात मिरची उत्पादनात अग्रेसर आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही मिरची उत्पादक इतर प्रमुख राज्ये आहेत.
देशातील काही प्रगत जातीमुळे मिरची उत्पादनात वाढ झाली आहे. एवढेच नाहीतर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. यामध्ये काशी अनमोल, अर्का सौफेल, अर्का लोहित, पुसा ज्वाला आदींचा समावेश आहे. तर मिरचीच्या संकरित जातीमध्ये काशी अर्ली, काशी सुरख, अर्क मेघना, अर्का श्वेता, अर्का आणि हरिता यांचा समावेश आहे.
Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी
Intercropping : उत्पादन वाढीसाठी कायपण? ऊसतोडणी होताच शेतकऱ्यांची भन्नाट Idea..!