मुंबई : उत्पादन वाढले तर दरात घट हा बाजारपेठेचा नियम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच असते. पण (Sugarcane Grower) ऊस उत्पादकांच्या बाबतीत तसे होणार नाही. कारण ऊस दराच्याबाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात उसाच्या (FRP) एफआरपीमध्ये तब्बल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हजणेच (Sugarcane Rate) यंदा उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन असा दर मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात ही वाढ करण्यात आल्याने याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शिवाय दर स्थिर असतानाही उसाच्या क्षेत्रात वाढ होत होती आता अधिकच्या दरामुळे उसाचे क्षेत्र देखील वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत टनामागे 150 रुपयांची वाढ झाली असली तरी ती साखरेच्या उताऱ्यावर अवलंबून राहणार आहे.10 टक्के उताऱ्यासाठी 2 हजार 900 असा दर गतवर्षी मिळाला होता. तर यंदापासून 10.25 टक्के साखर उताऱ्यासाठी 3 हजार 50 रुपये असा दर वाहतूक खर्चासहित मिळणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 2.6 टक्के एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या क्षेत्रामुळे उसाच्या दराबाबत चिंता व्यक्त केली जात होती. पण केंद्राच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गतवर्षी वाढत्या उत्पादनामुळे हंगाम लांबणीवर पडला होता. दिवसेंदिवस उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे दराबाबत साशंका वर्तवली जात असतानाच केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाहीतर मराठवाड्यात देखील उसाचे क्षेत्र वाढत आहे. देशात सर्वाधिक उसाचे गाळप हे महाराष्ट्रात होत असल्याने त्याचा फायदाही राज्यातील शेतकऱ्यांनाच अधिक प्रमाणात होणार आहे. गेल्या चार वर्षापासून ‘एफआरपी’ च्या दरात वाढ होत आहे. केंद्राने आता साखरेच्या किमान विक्री दरातही वाढ करण्याची मागणी होत आहे.
ऊस उत्पादनावरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त होते. आता दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सन 2019-20 पासून सुरु असलेली वाढ यंदाही कायम राहिलेली आहे. रास्त आणि किफायतशीर दर मिळत असल्याने आता पुन्हा ऊस क्षेत्रात वाढ होणार असा अंदाज आहे. 2019-20 मध्ये एफआरपी 2 हजार 750 एवढा होता तर 2020-21 मध्ये 2 हजार 850 तर गतवर्षी 2 हजार 900 व यंदा तो 150 रुपायांनी वाढून थेट 3 हजार 50 वर येऊन ठेपला आहे.
ही पण बातमी वाचा
Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!