नांदेड : क्षेत्र अधिक असल्यावरच उत्पादनात वाढ हा गैरसमज दूर करणारी शेती (Nanded) नांदेडचा तरुण शेतकरी करीत आहे. काळाच्या ओघात पारंपरिक पिकांना महत्व न देता उत्पादन वाढीच्या अनुशंगाने विचार केला जात आहे. केवळ विचारच नाही तर नव्याने व्यवसयात उतरणारे तरुण हा प्रयोगही करीत आहेत. (Mixed Farming) मिश्र शेती कशी फायद्याची आहे हे केवळ शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ऐकायला मिळते मात्र, नांदेड जिल्ह्यातील हानेगांव येथील रवींद्र घुळे यांनी हे करुन दाखवलं आहे. तब्बल 5 एकरामध्ये त्यांनी वेगवेगळी 9 पिकांचे उत्पादन घेतले आहे. शिवाय हा प्रयोग करण्यापूर्वीच लागवडीपासून काढणी पर्यंतचे त्यांनी (Proper Planning) नियोजन केले होते. त्यामुळे या अनोख्या प्रयोगातून 2 लाखाचे उत्पन्न मिळेल असा दावा या शेतकऱ्याने केला आहे. सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे. पण घुळे यांचा हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची शेत शिवारामध्ये गर्दी होत आहे.
मिश्र शेती काय असते याचे उत्तम उदारण हानेगांव येथील रवींद्र घुळे यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. त्यांनी या 9 एकरामधील 5 एकरामध्ये झेंडूची लागवड केली आहे तर इतर क्षेत्रावर शेवगा, सीताफळ, लिंबू पिकाची लागवड केली आहे. एवढेच नाही तर उर्वरीत क्षेत्रात त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. हे करीत असताना रब्बी किंवा खरीप हंगामातील एकाही पिकाला त्यांनी शेतजमिनीत स्थान दिलेले नाही. केवळ उत्पादनवाढीचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा प्रयोग केला आहे. सध्याच्या पोषक वातावरणामुळे सर्वच पिके बहरत आहेत हे विशेष.
यंदा पाणी मुबलक प्रमाणात असले तरी घुळे हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देतात. याचे नियोजन त्यांनी हा मिश्र शेतीचा प्रयोग करण्यापूर्वीच केले असून पिकांना योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत पाणी पुरवठा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच क्षेत्रावर आंतरपिक म्हणून त्यांनी भाजीपाला देखील जोपसला आहे. केवळ कष्ट करुन उत्पन्नात वाढ होत नाही तर त्याला अत्याधुनिकतेची जोड दिली तरच हे शक्य होणार असल्याचे घुळे यांचे म्हणणे आहे. 5 एकारातील पिकांना ठिबकच्या माध्यमातून पाणी मिळेल अशी सोय त्यांनी केली आहे.
मिश्र शेतीमुळे किमान दोन पिकांना तर चांगला दर मिळतो. असाच प्रकार घुळे यांच्याबाबत झाला आहे. सध्या शेवग्याचे दर वाढलेले आहेत. 120 रुपये प्रमाणे किलो असा दर शेवग्याला मिळालेला आहे तर फुंलानाही चांगला दर आहे. त्यामुळे अपेक्षापेक्षा अधिकचे उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांना आहे. मिश्र शेतीतून उत्पादन तर वाढतेच पण शेत जमिनीचा पोतही सुधारत आहे. सध्या त्यांचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी आणि राबवण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
पाच एकरमध्ये तीन पिकं घेतली
दोन लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित
ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेती
Nandurbar Market: मिरची बाजारात ‘तेजी’, विक्रमी दर मिळून होईल का नुकसानाची भरपाई?