लातूर : तब्बल महिन्याभरापासून (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले आहेत. त्यामुळे शेतकरीही गरजेनुसार विक्री अन्यथा साठवणूक असा दुहेरी खेळ करुन सावध राहत आहे. पण सोयाबीन याच दरावर स्थिर राहिल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात आवक वाढत आहे. दुसरीकडे (Rabi Season) रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभऱ्याने मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण 4 हजार 600 रुपये क्विंटल असलेला हरभरा हा आता 5 हजाराच्या जवळपास गेला आहे. हा दर हमीभावापेक्षा कमी असला तरी होत असलेली सुधारणा शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. कारण सोयाबीन आणि कापसाच्याबाबतीत जे झाले तेच आता हरभऱ्याच्या बाबतीत होत आहे. कारण आवक कमी होताच बाजारपेठेतील दर हे वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी होताना पाहवयास मिळेल काय?
रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी होताच बाजारपेठेत मोठी आवक सुरु झाली होती. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 40 ते 45 हजार क्विंटलची आवक झाली होती. पण दरात काहीच फरक पडत नाही हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी हरभरा साठवणूकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी केवळ 18 हजार क्विंटलची आवक झाली होती. तर दर हा 4 हजार 900 असा होता. गेल्या महिन्याभरात 4 हजार 600 वर असलेला हरभरा आता 5 हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे शेतकरी काय निर्णय घेणार यावरच अवलंबून आहे.
मध्यंतरी तुरीच्या दरात वाढ झाली होती पण वाढलेले दर हे टिकून राहिले नाहीत. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांमध्ये तुरीचे दर घसरुन थेट 7 हजार 200 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. दुसरीकडे हमीभाव केंद्रावर तुरीला 7 हजार 300 असा दर ठरवून दिलेला आहे. अवकाळी पाऊस आणि शेंग अळीच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे भविष्यात दर वाढतील असा आशावाद आहे.
सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन, हरभरा आणि तुरीच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक आवक ही सोयाबीनची आहे तर हरभऱ्याची आवकमध्ये कमालीची घट झाली आहे. शेतीमालाच्या दरानुसार शेतकरी विक्री की साठवणूक याचा निर्णय घेत आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट झाली असली अंतिम टप्प्यात दरवाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
Sangli : द्राक्षाचे तेच बेदाण्याचे, शेतकऱ्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाच, सर्वकाही व्यर्थ
Kharif Season : गावनिहाय होतेय खरीप हंगामाचे नियोजन, शेतकऱ्यांसाठी कोणत्या 25 बाबी महत्वाच्या ?