महाराष्ट्र : भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल म्हणजे येलो अलर्टचा (Yellow Alert) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. तथापि काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी 6 ते 8 एप्रिलदरम्यान सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासूनच आकाश ढगांनी आच्छादले होते. दुपारी सूर्यदर्शन झाले. मात्र दुपारनंतर पुन्हा सायंकाळपर्यंत अंधुक वातावरण अनेक जिल्ह्यात पाहायला मिळाले.
भंडारा, तुमसर, मोहाडी शहरात पावसाचे वातावरण होते. सकाळी तुरळक पाऊस पडला मात्र दिवसभर उघडीप होती. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. उष्णतेचा प्रभाव तितकासा जाणवला नाही, मात्र आजही वातावरणात काही प्रमाणात आर्द्रता होती. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर कुठे पावसाचा मागमूसही नाही. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसून आला.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचं नुकसान झालं आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात ११ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या यामध्ये अतोनात नुकसान झालं होतं. या नुकसानाची पाहणी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती, या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना दोन दिवसात पंचनामे पूर्वी करून मदत जाहीर केली जाणार असल्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र या गोष्टीला आता महिना उलटला आहे. परंतु शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन कुठे गेलं असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाचे आमदार यांनी कृषिमंत्री आणि सरकारवरती ताशेरे ओढले आहेत. शिंदे फडणवीस सरकार हे फेकू सरकार असून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार काही बोलत असतात त्यांना शेतकऱ्यांचे काही घेणं देणं नाही आहे. आतापर्यंत एकही शेतकऱ्याला मदत दिलेली नाही फक्त खोटं आश्वासन देण्याचं काम करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमाशय पाडवी यांनी केला आहे.