मुंबई : आंबा उत्पादनामध्ये भारताने जागतिक पातळीवर आपले महत्व कायम ठेवले आहे. यंदाच्या हंगामात अमेरिकेसह न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो या देशांमध्ये (Mango Export) आंब्याची निर्यात झाली आहे. आता (European countries) युरोपीयन देशांमध्ये भारतीय आंब्याला बाजारपेठ निर्माण व्हावी म्हणून ब्रेसेल्स येथे (Mango Festival) ‘मँगो फेस्टिव्हल‘चे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. या अनोख्या सोहळ्यामध्ये भारतामधील अनेक प्रकारचे आंबे होते. त्यामुळे आगामी काळात युरोपातील देशांना भारतीय आंब्याची चव चाखायला मिळणार हे नक्की.
भारतामध्ये विशेषत: कोकणात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शिवाय विविधतेत एकता याप्रमाणे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती असल्या तरी रसाळ आणि गोडवा हा सारखाच आहे. त्यामुळे युरोपीय भाग वगळता उर्वरित जगात आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही केवळ निर्यातीमुळे आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता युरोपीय राष्ट्रांमध्येही बाजारपेठ निर्माण होत असल्याने अधिकची मागणी होणार यामध्ये शंका नाही.
Brussels, Belgium | Union Minister Piyush Goyal inaugurated ‘Mango Festival’ in Belgium on 17th June to create awareness among the Europeans and create a market for Indian mangoes in Europe pic.twitter.com/e6AkQngiWM
— ANI (@ANI) June 18, 2022
भारतामधून अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात केली जाते. आंबा पुरवठादार म्हणून आंब्याची ओळख आहे. आता ही ओळख युरोपीयन राष्ट्रांमध्येही होणार आहे. त्याच अनुशंगाने ब्रेसेल्स येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे येथील नागरिकांना भारतीय आंब्यांची चव चाखता आली आहे. शिवाय महोत्सवाला मिळालेल्या प्रोत्साहानंतर युरोयपीय युनियनमधील भारतीय राजदूत यांनी येथील मार्केट बद्दल विश्वास व्यक्त केला आहे. या देशांमध्ये आंब्याला अफाट मागणी होईल असेही त्यांनी सांगितले आहे.
सातासमुद्रा पार आंबा महोत्सावाचे आयोजन केल्याने त्याचे वेगळेपणही आहे. मात्र, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. शिवाय नागरिकांनी आंब्याची चव चाखली असून भविष्यात युरोपीयन देशांमध्येही भारतीय आंबा चाखला जाणार असल्याचा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे.