जळगाव : पिकांची उगवण झाली की त्याबरोबर (Pest Infection) किडीचा प्रादुर्भाव हे आता ठरलेलंच आहे. मात्र, आतापर्यंत ज्वारी आणि मका पिकावर आतापर्यंत किडीचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. यंदा (Change Climate) वातावरणातील बदलामुळे या पिकांचीही सुटका झालेली नाही. मराठवाड्यासह खानदेशात (Maize Production ) मका या पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे किडनाशकाची फवारणी करुनही पुन्हा 15 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव दोन महिन्याच्या पिकांमध्ये वाढलेला आहे. योग्य व्यवस्थापन करुनही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मकाची उगवण झाली की 15 दिवसांनीच फवारणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. यावर किटकनाशकांची फवारणी करुन पिकांची जोपसणा करण्यात आली होती. पण पुन्हा अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे उत्पादनावरील खर्चात वाढ झाली आहे.
मका पीक जोमात असतानाच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे मका पिकाची पाने कुरतडली जात आहेत तर वाढीवर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मक्याच्या पोंग्यामध्ये किडनाशकाचे द्रावण टाकावे किंवा काही शेतकरी हे यामध्ये वाळू देखील टाकतात. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होतो. वाढत्या किडीमुळे पिकाचा अगदी सापळाच होऊ लागला आहे. भविष्यात उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी एकरी 5 ते 6 कामगंध सापळे लावून या किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शिवाय यावर निर्बंध लादण्यासाठी उपयुक्त किडनाशके आणि निविष्ठा अनुदानावर उपलब्ध करुन देणेही आता गरजेचे झाले आहे.
केवळ उत्पदानामुळेच नाही मका लागवडीने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काहीअंशी मार्गी लागतो. त्यामुळे उन्हाळी हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यंदा मात्र, वातावरणातील बदलामुळे लागवडीपासूनच पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे. याकरिता एकरी 300 ते 400 रुपये शेतकऱ्यांना खर्च येत आहे. असे असूनही दर 15 दिवासांनी किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे पण पिकाची वाढ खुंटल्याने भविष्यात चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.
Cotton Market: एवढंच राहिलं होत, एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून लूट